आम्ही गांधीजयंती,
प्रजासत्ताक दिन
आणि स्वातंत्र्य दिन
अशा खास दिवशी
बापूंच्या हसर्या तसबिरीवर
एकत्र येऊन फुलमाळा घातल्यात
एका सूरात घोषणा दिल्यात-
महात्मा गांधी अमर रहें...च्या.
तेव्हा आमच्या उरामध्ये धडधडत
असायचे बापू
वक्तृत्वस्पर्धेत बापूंच्या व्यक्तिमत्वावर
मी दिलेले भाषण ऐकून
त्यांनी दरवेळेस खांद्यावर उचलून घेतले आहे मला
पहिल्या पुरस्कारासाठी माझी
निवड होताच त्यांनी
इतका आनंद व्यक्त केलाय की
जणूकाही पुरस्कार मला नव्हे
त्यांनाच मिळालाय
पण,मागील
काही वर्षांपासून
न जाणे कसले वारे सुटलेय देशात
माझे मित्र बापूंना देताहेत शिव्या
मला मुर्ख आणि वेडा म्हणताहेत
कारण आजदेखील मी
गांधी जयंती,प्रजासत्ताक दिन
आणि स्वातंत्र्यदिनादिवशी
बापूंच्या हसर्या तसबिरीला हार घालत असतो
आणि घोषणा देत असतो
बापू अमर रहें!
कारण आजसुद्धा माझ्या हृदयात
धडधडताहेत बापू
हायस्कूलमधले मित्र बदलले आहेत
जेव्हाही मी
करीत असतो शांतता,परस्पर प्रेम आणि
सद्भावाच्या गोष्टी
ते टाळ्या वाजवित हसत असतात
आपल्या कुतर्कांनी सिद्ध करू पाहात असतात
की खरोखरच मी मुर्ख आणि वेडा झालोय
पूर्वी तर असे नव्हते माझे मित्र
शांतता,परस्पर प्रेम आणि
सद्भावाबाबतचे बोलणे ऐकून
लगेच गळाभेट घ्यायचे
आणि म्हणायचे,
आम्हांला तुझा अभिमान वाटतो
कुंदन!
कुणी हडपलाय त्यांचा अभिमान?
त्यांच्या अंतरातला गोडवा कुणी हिरावून घेतलाय?
कुणी पेरलाय तिरस्कार,
ज्याच्या प्रवाहात काहीबाही बडबडताहेत
माझे मित्र?
नेहमी याचा विचार करतो
आणि निराश होऊन जातो
पाहातो बापूंची तसबीर
तेही हसत आहेत निरंतर
मी काय करावे बरं?
मूळापासून उखडले गेलेय
माझे हसू.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
हाई स्कूल के दोस्त
हमने गांधी जयंती, गणतंत्र दिवस
और स्वतंत्रता दिवस के मुबारक मौके पर
बापू की हँसती तस्वीर पर साथ-साथ माला पहनायी है
समवेत स्वर में लगाये हैं नारे -- बापू अमर रहें
तब हमारे सीनों में धड़कते थे बापू
भाषण प्रतियोगिताओं में
बापू के व्यक्तित्व पर मेरा वक्तव्य सुन
उन्होंने हर बार कंधों पर उठा लिया है
प्रथम पुरस्कार के लिए चुने जाने पर
इतनी खुशियाँ मनायी हैं
जैसे पुरस्कार मुझे नहीं
उन्हें मिला हो
कुछ बरसों से
न जाने कैसी हवा चली देश में
मेरे दोस्त बापू को देने लगे गालियाँ
मुझे मूर्ख और पागल कहने लगे
क्योंकि आज भी मैं गांधी जयंती, गणतंत्र दिवस
और स्वतंत्रता दिवस के मुबारक मौके पर
बापू की हँसती तस्वीर पर माला पहनाता हूँ
और लगाता हूँ नारा -- बापू अमर रहें
क्योंकि आज भी मेरे सीने में
धड़कते हैं बापू
हाई स्कूल के दोस्त बदल गये
जब भी करता हूँ
शांति, आपसी प्रेम और सद्भाव की बातें
वे तालियाँ पीटकर हँसते हैं
अपने कुतर्कों से सिद्ध करना चाहते हैं
कि सच में मैं मूर्ख और पागल हो गया हूँ
पहले तो ऐसे नहीं थे मेरे दोस्त
शांति, आपसी प्रेम और सद्भाव की बातें सुनकर
तुरत गले से लगा लेते और कहते
हमें तुझ पर गर्व है कुंदन
किसने हड़प लिया उनका गर्व?
उनके भीतर की मिठास किसने छीन ली?
किसने बो दी नफ़रत जिसकी रौ में
अल्ल-बल्ल बकने लगे मेरे दोस्त?
अक्सर सोचता हूँ
और उदास हो जाता हूँ
देखता हूँ बापू की तस्वीर
वह अब भी हँसे जा रहे
अनवरत
मैं क्या करूँ?
जड़ से उखड़ गयी है
मेरी हँसी
©kundan Sidharth
कुंदन सिद्धार्थ