काही स्त्रिया

काही स्त्रिया

काही स्त्रिया

प्रेम-प्रेम ऐकत-चिंतत
विचार करीत असते प्रेमाचा
आणि विवाहबंधनात बांधली जाते,

वर्षानुवर्षे पतीसोबत राहिल्यानंतर
कधीतरी या जाणीवेने 
भरून जाते की,
ती वेगळ्या कुण्या पुरूषाच्या 
प्रेमात आहे,

की वेगळीच कसलीशी तडफड अनुभवतेय,
अस्सल प्रेमाची जणू
आत्ता अनुभूती घेते आहे ती,

प्रेमाच्या या रसापासून अनभिज्ञ ती 
केवळ अंथरत जात होती
चालत चालली होती
झोपी जात होती
जागी राहात होती

प्रेमाच्या दिव्यत्वामुळे डोळ्यात पसरलेली आभा ती आरशात न्याहाळात
कितीक वर्षांनंतर सजते आहे
नटते आहे
स्वतःला निरखते आहे
स्वतःला स्वतःच्या दृष्टीतून बघते आहे

काही क्षण 
काही दिवस
काही महिने ती
प्रेमात जगते
जाणीवांच्यामध्ये तरंगते
तारे तोडते
चांदणं भरते

मग एके दिवशी
समाजाच्या दृष्टीकोनातून 
वाचत जाते स्वतःला
आकाशातून जमिनीवर येते
प्रेमाचे पंख उतरवून ठेवते
आणि माघारी परतते तिथेच
जिथे निश्चित केले होते समाजाने
की मरेपर्यंत
तू आणि तुझ्या इच्छा
या उंबरठ्याबाहेर जाता कामा नयेत!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

कुछ स्त्रियां

प्रेम-प्रेम सुुुनती-गुनती 
सोचती हैं प्रेम
और विवाह  बन्धन में बंध जाती हैं,

बरसो  बरस पति के साथ रहने के बाद
कभी इस अहसास से भर जाती हैं
कि वे अलग 
किसी पुरुष के प्रेम में हैं,

कि अलग कोई कशिश अनुभूत कर रही हैं 
किअसल प्रेम को अब अनुभूत कर रही हैं वे

प्रेम के इस रस से अनजान वह तो
मात्र बिछ रही थीं
चल रही थीं
सो रही थीं
जग रही थीं

प्रेम की दिव्यता से 
आंखों में आयी चमक को वे
आईने में देखती हैं
बरसो  बाद सजती हैं
संवरती हैं
ख़ुद को निहारती हैं
खुद को खुद की नजर से देखती हैं

कुछ पल
कुछ दिन
कुछ महीने वे
प्रेम को जीती हैं
अहसास में उड़ती हैं
तारे तोडती हैँ
चांदनी भरती हैं

फिर किसी दिन वे
समाज की नजर से पढ़ती हैं खुद को
आसमान से नीचे उतरती हैं
प्रेम के पंख उतार देती हैं
औऱ लौट आती हैं वहीं
जहां तय किया था समाज ने
कि मरने तक
तुम और तुम्हारी इच्छाएं
इस देहरी से बाहर नही जानी चाहिए।

©वीरेंदर भाटिया
Virender Bhatia 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने