नद्या कोसळतात
तेव्हा भूगोलाचा विषय बनतात
नद्या भेटतात
तेव्हा समाजशास्त्राचा विषय बनतात
नद्या जोडल्या जातात
तेव्हा तर्कशास्त्राचा विषय बनतात
नद्या वाहात असतात
तेव्हा तत्त्वज्ञानाचा विषय बनतात
नद्या घटतात
तेव्हा गणिताचा विषय बनतात
नद्या प्रवाह बदलतात
तेव्हा इतिहासाचा विषय बनतात
नद्या उफाळतात
तेव्हा हिंदीचा/भाषेचा विषय बनतात
नद्या फुटतात
तेव्हा स्त्रीविषयक चर्चेचा विषय बनतात
पण नद्या मरतात
तेव्हा 'शरमे'चा विषय बनतात.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
विषय में नदियाँ
नदियाँ गिरती हैं
तो भूगोल का विषय बनती है
नदियाँ मिलती हैं
तो समाजशास्त्र का विषय बनती है
नदियाँ जुड़ती हैं
तो तर्कशास्त्र का विषय बनती है
नदियाँ बहती हैं
तो दर्शनशास्त्र का विषय बनती है
नदियाँ घटती हैं
तो गणित का विषय बनती है
नदियाँ धारा बदलती हैं
तो इतिहास का विषय बनती है
नदियाँ लहराती हैं
तो हिंदी का विषय बनती हैं
नदियाँ फूटती हैं
तो स्त्री विमर्श का विषय बनती हैं
पर नदियाँ मरती हैं
तो 'शर्म' का विषय बनती हैं।
©बच्चा लाल 'उन्मेष'
Bachcha Lal Unmesh
चित्र साभार:
अनु प्रिया