आजकालचे अभंग

आजकालचे अभंग

आजकालचे अभंग
🚩
किती कृतघ्नता
किती व्हाल नीच
खुद्द धन्याचीच
विटंबना?

कलम कसाई
होते एकेकाळी
आता तीच टोळी
सिनेमात

जिरता जिरेना
श्रेष्ठत्वाचा कंड
जातीअहंगंड
शिगोशिग

आहे म्हणे जगी
जात एक थोर
बाकी सारा केर
समाजात

मनुची विकृती
येते उफाळून
पडे उन्मळून
माणूसकी

बहू चेकाळले
ऐरे-गैरे आता
पुन्हा तोच कित्ता
गिरविती

सडक्या मेंदूंनी
भरली विकृती
तेच मानताती
अवतार

पुराणनिर्मिती
थांबलेली नाही
नवी भटशाही
कार्यरत

खोटा इतिहास
रुजवू पाहाती
तीच संघनीती
वापरती

'शिवराय म्हणे
विष्णुचाच अंश'
विषारी हा दंश
वैदिकांचा

धर्मलंपटांचा
माजला बाजार
खुनशी व्यवहार
थोतांडाचा

शिवचरित्र हे
साक्षात अंगार
धरू जाल जर
व्हाल राख!
🚩
     -भरत यादव
Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने