जात

जात

जात

जात आता विचारली जात नाही,
पण कधी अदमास घेत
नाव बघत-
कधी शहर-हुद्दा बघत
ताडली जाते.

शतकांपासून 
आता विवाहापूरतीच
मर्यादित झालीय जात-
पण ती आहे,
मर्यादित होऊनदेखील ती
समाजात मिसळत राहाते.

ती आहे,
बंद खोल्यांच्याआड,
जेव्हा जातीअहंगंडाचे किस्से
ऐकवत असतात आई-बाप 
एखाद्या नव्या लेकराला.

ती आहे,
कोर्टरूममध्ये
जेव्हा सुप्रीम कोर्ट घोषित करतं
स्वतःला पवित्र
आणि नाही बनू शकत कधी जज
कुणी ओबीसी-कुणी महिला-कुणी दलित.

ती आहे,
नोकरशहांच्या कार्यालयात
जिथे शिकले सवरलेले अधिकारी
नकार देत असतात
खेड्यापाड्यातल्या कुणा 
गावकर्‍याची तक्रार ऐकण्यास.

ती आहे,
मिडियाच्या घरांमध्ये
जेव्हा 
दाबली जात असते बातमी
अमूक एका जातीची.

ती आहे,
फक्त शहरांमधल्या भूमीगत-मौन
गटाराप्रमाणे
प्रत्येक घराखालून वाहात जाते,
जिच्या दुर्गंधीची जाणीव
फक्त त्यांनाच असते
जे तिला स्वच्छ करण्यात गुंतले आहेत.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

जाति अब पूछी नहीं जाती,
कभी अंदाज़े से 
नाम देख-
कभी शहर-मुकाम देख
भाँप ली जाती है।

जाति सदियों से 
अब शादियों तक 
सिमट तो गयी है-
पर वो है,
सिमट कर भी वो 
समाज मे घुलती जाती है। 

वो है,
बन्द कमरों के पीछे,
जब जाति दंभ के किस्से 
सुनाते हैं माँ बाप किसी नए बच्चे को। 

वो है,
कोर्टरूम में
जब सुप्रीम कोर्ट घोषित करती है 
खुद को पवित्र 
और नहीं बन पाता कभी जज 
कोई ओबीसी-कोई महिला-कोई दलित।

वो है,
बाबू साहबों के दफ्तरों में
जहां पढ़े लिखे अफ़सर 
करते हैं इंकार 
किसी गांववाले की जिरह सुनने से। 

वो है,
मीडिया के मकानों में
जब 
दबा दी जाती है खबर फलाँ जात की। 

वो है,
बस शहर के खामोश नाले की तरह
हर घर के नीचे से बहती 
है जाति
जिसके दुर्गंध का मालूम है 
बस उनको
जो उसे साफ करने में लगे हैं।।

©किताबगंज
Kitabganj
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने