तडजोड

तडजोड

तडजोड

आयुष्य तडजोडीमुळेच चालते
त्यामुळेच नोकरी मिळते,
पदोन्नती होते
मालकाचा वा वरिष्ठाचा विश्वास संपादन होऊ शकतो,
दुकानदारी चालते
तडजोडी करणार्‍यांच्या आयुष्यात
वादळे येत नाहीत,पूर येत नाहीत
आले तरी नुकसान दूसर्‍यांचे होते

तडजोड करणे भले-सज्जन
होण्याचे लक्षण आहे
चारित्र्याचे प्रमाणपत्र आहे

घटस्फोटापासून वाचण्याचा खात्रीलायक उपाय आहे
तडजोडीनेच सत्ता मिळते
आणि दीर्घकाळ टिकते
संपत्ती निर्माण होते,
लोकप्रियता मिळते
हार्टफेल आणि ब्रेन हॅम्रेजपासून
वाचण्यासाठी डाॅक्टर याचा सल्ला देत असतात,
तडजोडी करीत चला
तर जगात आपले नाणे खणखणेल

तडजोडी कराल तर 
काहीही अश्लील
काहीही अकारण राहात नाही
काहीही अस्वस्थ वाटत नाही त्रासदायक ठरत नाही
काहीही,कसेही करणे धर्मासारखे वाटते
मारेकरी हे सज्जन पुरुषांमध्ये बदलून गेल्याचे दिसून येतात
आदरणीय होऊन फादरणीय होतात
हक्काची लढाईसुद्धा दहशतवाद वाटायला लागते
तिरस्कार पसरवणे संस्कृतीच्या प्रचार-प्रसाराचे महत्वपूर्ण अंग बनल्यासारखे वाटते

तडजोड ही काळाची गरज आहे
समस्त शास्त्रांचे सार आहे
तडजोड करणे सेल्फी घेण्याइतके सहज-सोपे आहे
तडजोड हा प्रत्येक शहराचा 
महात्मा गांधी मार्ग आहे

तडजोडीमुळे पुरस्कार मिळाल्याशिवाय राहात नाही
भारतमातेचा सच्चा सुपुत्र 
बनण्याचे भाग्य मिळते
आणखी काही नाही झाले तरी देशाचा विकास तरी 
होतोच होतो
अरे 'विकास', विनाश नव्हे,'विकास'.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

एडजस्टमेंट

जिंदगी एडजस्टमेंट से ही चलती है
उसीसे नौकरी मिलती है, पदोन्नति होती है
मालिक या अफसर का विश्वास हासिल होता है
दुकान चलती है
एडजस्टमेंट करनेवालों की जिंदगी में 
तूफान नहीं आते, बाढ़ नहीं आती
आ भी जाए तो नुक्सान दूसरों का होता है

एडजस्टमेंट करना भला- शरीफ
होने का लक्षण है
चरित्र का प्रमाणपत्र है

तलाक से बचने का शर्तिया उपाय है
एडजस्टमेंट से ही सत्ता मिलती है
देर तक टिकती है
पैसा बनता है, लोकप्रियता मिलती है
हार्टअटैक और ब्रेन हैमरेज से बचने के लिए
डॉक्टर इसकी सलाह दिया करते हैं
एडजस्टमेंट करके चलो
तो दुनिया में अपनी तूती बोलती है 

एडजस्टमेंट कर लो तो कुछ भी अश्लील 
कुछ भी अकरणीय नहीं रह जाता
कुछ भी बेचैन-परेशान नहीं करता
कुछ भी,कैसे भी करना धर्म सरीखा लगता है
हत्यारे , सज्जन पुरुषों में तब्दील हुए दीखते हैं
आदरणीय होकर फादरणीय हो जाते हैं
हक की लड़ाई भी आतंकवाद लगने लगती हैं
नफरत फैलाना संस्कृति के प्रचार-प्रसार का
अभिन्न अंग मालूम देता है

एडजस्टमेंट समय की पुकार है
शास्त्रों का सार है
एडजस्टमेंट करना सेल्फी लेने जितना आसान है
एडजस्टमेंट हर शहर का महात्मा गाँधी मार्ग है

एडजस्टमेंट का पुरस्कार मिलकर रहता है
भारत माँ के सच्चे पुत्र होने का
सौभाग्य मिलता है
और कुछ हो न हो मगर देश का ' विकास '
होकर रहता है
अरे ' विकास' , विनाश नहीं,
 ' विकास '।

©विष्णु नागर
Vishnu Nagar 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने