बागेश्वर बरळतो,
करी तुकोबांची निंदा
हाणा कितीही चपला
हाच वैदिकांचा धंदा
ऐशा निर्लज्ज औलादी
मठोमठी निपजती
सनातनी डबक्यात
येई थोतांडा भरती
शेण भरले डोक्यात
शेणे कुरूपली मने
शेण खाती शेण पिती
शेण हगती तोंडाने
भक्तीच्या या बाजारात
अंधश्रद्धेला उधाण
पाठी उभी संघसत्ता
करी अभय प्रदान
तुझ्या अकलेची कीव
किती करावी बा आता
देहूच्या या विद्रोह्याची
तुला कळेना महत्ता
मायमाऊली आवली
तिची का रे बदनामी?
विठु श्वास तुकयाचा
भार्या वसे अंतर्यामी
ही गा शब्दांची श्रीमंती
तुकोबांचे आम्हां देणे
तुझ्या भिकार वृत्तीला
आम्ही ठोकरू लाथेने!
-भरत यादव
Bharat Yadav