देव
दैवी सत्तेचे भय दाखवण्यासाठी येतात
आणि राजा
राजसत्तेचे
प्रजा ही
पायाखाली चिरडून जाण्यासाठी असते
मग ती देवाच्या वाटेत येवो
अथवा राजाच्या
जनता
ज्यादिवशी
पायावर नाही
गळ्यात हात घालेल
दैवीसत्ता आणि राजसत्ता
तेव्हा
प्रजेच्या पायी लोळण घेऊन
विनवण्या करतील
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
ईश्वर
ईश्वरीय सत्ता का डर दिखाने आते हैं
और राजा
राज सत्ता का
अवाम
पैरों में कुचले जाने के लिए होती है
ईश्वर की राह में आये
या कि राजा के
प्रजा
जिस दिन
पांव में नही
गले मे हाथ डालेगी
ईश्वरीय सत्ता और राजसत्ता
तब
प्रजा के पांव में गिर
गिड़गिड़ायेगी
©वीरेंदर भाटिया
Virender Bhatia