चोर आणि पोलिस
मी एका आदिवासी भावाला विचारले,
'तुझ्या घराला दरवाजा नाही,
इथं चोर येत नाहीत?'
तो म्हणाला,' साहेब,
गरीबाची गरीबी चोरायला कोण येईल?'
मी विचारले,
'म्हणजे इकडे पोलीस येत नाहीत?
आदिवासी भाऊ म्हणाला,
'येतात ना साहेब,
जेव्हा श्रीमंतांच्या घरात घड्याळ किंवा
पैसे चोरीला जातात तेव्हा पोलीस
आमच्या वस्तीत ते सामान
शोधायला येतात,
आम्हाला बदडतात आणि
निघून जातात.'
मी विचारले,
'याचा अर्थ पोलिस वाईट असतात?'
आदिवासी बोलला,
'पोलिस तर मायबाप आहेत,
ते श्रीमंतांच्या श्रीमंतीचं रक्षण करतात
आणि गरीबांच्या गरीबीचं!'
मराठीकरण
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी संवाद
मैंने आदिवासी से पूछा 'तुम्हारे घर में दरवाज़ा नहीं है,
क्या इधर चोर नहीं आते ?'
उसने कहा साहब गरीब की गरीबी चुराने कौन आएगा ?
मैंने पूछा तो क्या इधर पुलिस नहीं आती ?
आदिवासी बोला, आती है न साहब,
जब अमीरों के यहाँ कोई घड़ी या पैसा चोरी हो जाती है
तो पुलिस हमारी बस्ती में वो सामान खोजने आती है,
हमें पीटती है और चली जाती है,
मैंने पूछा तो क्या पुलिस खराब होती है ?
आदिवासी बोला पुलिस तो माई बाप है,
वो अमीरों की अमीरी की रक्षा करती है और गरीबों की गरीबी की ,
©हिमांशु कुमार
Himanshu Kumar