वाढत्या वयाच्या लेकीला
समजावताना बोलली आई-
लेकी, बाईचं तर
झाडसुद्धा वैरी असतं बरं!
पोरीने विचारले
जिज्ञासावृत्तीने-
ते कसं गं आई?
जीवनाचा अनुभव
कथन करताना
आई म्हणाली-
लेकी,
झाडाच्या जवळून
कुणी पुरुष गेला
तर शांत राहील झाड
पण तेच जर कुणी बाई
त्याच्याजवळून गेली
तर मात्र
बाकी काही नाही
पण
बाईची ओढणी
किंवा साडीचा पदर तरी
पकडेल तेच झाड
सांभाळून चाल गं नेहमी
माझे बयो!
बाईचं तर
झाडसुद्धा वैरी असतं!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
माँ की सीख
बड़ी होती हुई बेटी को
समझाते हुए कहा माँ ने-
बेटी औरत का तो
झाड़ भी दुश्मन है
बिटिया ने पूछा
जिज्ञासा भाव से-
वो कैसे माँ?
जीवन अनुभव
साझा करते हुए
माँ ने बताया-
बिटिया
झाड़ के नज़दीक से
कोई पुरुष निकलेगा
शांत रहेगा झाड़
ज्यों ही कोई स्त्री
गुजरेगी उसके पास से
और कुछ नहीं तो
स्त्री की चुनरी
या साड़ी का पल्लू ही
पकड़ लेगा वही झाड़
संभलकर चलना सदा
मेरी लाडो
औरत का तो
झाड़ भी दुश्मन होता है।
©जसवीर त्यागी
Jasvir Tyagi