चड्डी
------
प्रभुः हे वत्सा, चड्डी सोडून पॅन्ट का परिधान केली?
चड्डीधारीः हे प्रभो,त्या वस्त्रात लाज वाटायची म्हणून सोडून दिले.
प्रभुः जेव्हा आपल्या विचारांची लाज वाटू लागेल तेव्हा ते ही सोडून द्यायला विसरू नकोस.
तशी तुला लवकर लाज वाटणार नाहीए म्हणा!
कल्याण भव!
चड्डी-२
--------
प्रभुः तुझी चड्डी इतकी घेरेदार का आहे?
चड्डीधारीः हे प्रभो,
ताज्या हवेचा ओघ गतीशील राहावा
म्हणून!
प्रभुः ताज्या आणि स्वच्छ हवेची गरज तुझ्या मेंदूला आहे,यासाठी मेंदूची कवाडे उघड,चड्डीची नव्हे!
कल्याण भव.
चड्डी-३
चड्डीधारीः हे प्रभो,चड्डी सोडून पॅन्ट नेसतोयत तरीही सर्वजण आम्हांला चड्डी चड्डी म्हणूनच का चिडवतात
बरं?
प्रभुः हे चड्डीधारी,
ज्याप्रमाणे भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या साठ वर्षांनंतर
तिरंगा ध्वज आणि राष्ट्रगान यांचा स्विकार केल्याने कुणी खरा देशभक्त बनू शकत नाही,त्याप्रमाणे कुणी चड्डी सोडून पॅन्ट परिधान करू लागल्याने विचार बदलत नाहीत.
लोकांना तुझे सत्य ठाऊक आहे,
त्यामुळे तुला ते चड्डी म्हणतात!
सुखी भव.
चड्डी-४
प्रभुः हे वत्सा,तुम्हा लोकांना ही चड्डीची युक्ती कशी सूचली? चड्डी तर स्वदेशी वस्त्र नाहीए.
चड्डीधारीः प्रभो,आपल्यापासून काय लपून राहिलंय?
आमच्या विचारांचा आणि आमच्या पोशाखाचा मूळ स्त्रोत
हिटलर-मुसोलिनीकडून आलाय.
प्रभुः पण हे तर विदेशी होते?
चड्डीधारीः 'वसुधैव कुटुंबकम' वाले आहोत ना आम्ही! आपल्या भाईबंदांकडून प्रेरणा घेणे,
हे प्रभु,
अयोग्य कसे म्हणता येईल बरं?
प्रभुः नाही वत्सा,अजिबात नाही.
माझा आशिर्वाद आहे तुम्हाला की तुमची पण तीच अवस्था होवो,जी त्यांची झाली होती.
चड्डी-५
प्रभुः हे वत्सा,मला कमळाची फुले आवडतात परंतू ती नव्हे जी चड्डी नेसून उमलत असतात.
चड्डीधारीः त्यासाठीच तर आता पॅन्ट नेसली आहे, प्रभो!
प्रभुः हं..पॅन्टीत उमललेलं कमळ शोभत नाही,गड्या!
सुंदर नैसर्गिक कमळ तर ते असतं जे चिखलात
उमलत असतं.
चड्डीधारीः आमच्या मेंदूंमध्येही तोच चिखल भरलेला आहे,प्रभो!
प्रभुःसत्य वचन,खूप जगा!
मराठी अनुवाद
भरत यादव
मूळ हिंदी लघुकथा
पाँच लघुकथाएँ
चड्डी
______
प्रभु:हे वत्स चड्डी छोड़ पैंट क्यों धारण की?
चडड्डीधारी:हे। प्रभो उन वस्त्र में शर्म आती थी इसलिए त्याग दिया।
प्रभु:जब अपने विचारों से शर्म आने लगे तो उन्हें भी त्यागना मत भूलना। वैसे शर्म जल्दी तुम्हें आनेवाली नहीं।कल्याण भव!
चड्डी-२
______
प्रभु:तुम्हारी चड्डी इतनी घेरदार क्यों है?
चड्डीधारी:हे प्रभो ताकि स्वच्छ वायु का प्रवाह गतिमान बना रहे।
प्रभु:स्वच्छ वायु की आवश्यकता तुन्हारे दिमाग को है,इसलिए दिमाग के द्वार खोलो, चड्डी के नहीं।कल्याण भव!
चड्डी -३
_______
चड्डीधारी:हे प्रभो चड्डी छोड़ के पैंट पहनने पर भी सब लोग हमें चड्डी कहकर चिढ़ाते क्यों हैं?
प्रभु:हे चड्डीधारी जैसे भारत देश की स्वतंत्रता के ६० साल बाद तिरंगा झंडा और राष्ट्रगान अपनाने से कोई सच्चा देशभक्त नहीं बन जाता, उसी तरह कोई चड्डी छोड़ के पैंट पहनने से विचार नहीं बदल जाते।लोग तुम्हारा सच जानते हैं,इसलिए तुम्हें चड्डी कहते हैं।सुखी रहो!
चड्डी -४
______
प्रभु:हे वत्स तुम लोगों को यह चड्डी का आइडिया कहाँ से आया?चड्डी तो स्वदेशी वस्त्र नहीं है।
चड्डीधारी: प्रभो आपसे क्या छिपा है, हमारे विचारों और हमारे इस वस्त्र का स्त्रोत हिटलर -मुसोलिनी से प्राप्त हुआ है।
प्रभु: परंतु ये तो विदेशी थे?
चड्डीधारी:वसुधैव कुटुबंकम वाले हैं न हम!अपने भाई- बंधुओं से प्रेरणा ग्रहण करना प्रभु अनुचित कैसे कहा जा सकता है?
प्रभु:नहीं वत्स बिल्कुल नहीं।मेरा आशीर्वाद तुम्हारे साथ है कि तुम्हारी गति भी वही हो, जो उनकी हुई थी।
चड्डी -५
______
प्रभु: हे वत्स मुझे कमल के फूल बहुत पसंद हैं लेकिन वह नहीं जो चड्डी पहन के खिलता है।
चड्डीधारी:इसलिए तो पैंट धारण की है प्रभो।
प्रभु:हूँ पैंट में खिला कमल शोभा नहीं देता।सुंदर स्वाभाविक कमल तो वह होता है,जो पंक में खिलता है।
चड्डीधारी:हमारे दिमाग़ों में वही पंक तो भरा हुआ है प्रभो।
प्रभु:सत्य वचन,ख़ूब जिओ।
©विष्णु नागर
Vishnu Nagar