सर्पा,
तू सभ्य तर झाला नाही
शहरात वसणे देखिल
तूला आले नाही
एक गोष्ट विचारू?
( उत्तर देशील?)
मग कसे काय
शिकलास डसायला-
विष कुठे मिळाले?
२.
जे सेतू बनवतील
ते अनिवार्यपणे
मागे राहतील.
सैन्य जाईल पल्याड
मारले जातील रावण
विजयी होतील राम,
जे निर्माणकर्ते होते
इतिहासामध्ये
माकड म्हणवले जातील.
मूळ हिंदी कविता
सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन
उर्फ 'अज्ञेय'
( ७-०३-१९११ ते ४-०४-१९८७ )