ते दोघे भाऊ-भाऊ होते
दोघांमध्ये वाटणीवरून वाद होता
कोर्टबाजी सुरू होती
पण अबोला नव्हता
दोघे कचेरीसाठी निघायचे तेव्हा
जो अगोदर बसस्टॅडवर पोहोचायचा
तो बस थांबवायचा,
सिट धरुन ठेवायचा,
दूसर्या भावासाठी
दोघे एकाच सिटवर बसायचे बर्याचदा
आणि
शहरात पोहोचत,
आपापल्या वकिलांना भेटत
पण चहा सोबतच प्यायचे
पैसे थोरलाच द्यायचा
आणि दुपारचे जेवण
दोघे एकाच झाडाच्या सावलीत
सोबतच जेवत असत
थोरल्यासाठी धाकटा पाणी आणायचा,
हात धुवायचा,
साहित्य गोळा करुन
पिशवीत ठेवायचा
कधीकधी असेही व्हायचे
की कुणाच्या तरी घरी
कचेरीची बस जाईपर्यंत
डबा तयार होण्यास वेळ लागेल असे दिसायचे,
तेव्हा एकजण दूसर्याला सांगायचा,
'आज माझी पण भाकर बांधून घे'
आणि कधीकधी असेही
घडायचे की विरुद्ध पक्षाचा वकील
एका भावाला बरेवाईट बोलला तर
दोघेही त्याच्याशी भांडत असत
माघारी परततानासुद्धा
दोघे एकत्रच यायचे
एकाच बसमध्ये एकाच सिटवर बसून
आणि बसमधून उतरुन
गप्पा मारत घरी पोहोचायचे
गावातले लोक बघत असत
जाता-येता लहान्या भाऊ
थोरल्याची पिशवीदेखील
स्वतःच्या खांद्यावर घेत असे.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
भाई और मुकदमा
वे दोनों भाई थे
दोनों के बीच बंटवारे का विवाद था
मुकदमे बाजी थी
पर अणबोला नहीं था
दोनों कचहरी जाते
तो जो पहले बस स्टेंड पहुंच जाता
बस रुकवाए रहता
सीट रोके रहता दूसरे के लिए
दोनों एक ही सीट पर बैठकर जाते अक्सर
और शहर पहुंच कर
अपने अपने वकील से मिलते
पर चाय साथ साथ ही पीते
पैसे बड़ा ही देता
और लंच में
दोनों एक ही पेड़ की छांव में एक साथ खाना खाते
बड़े के लिए छोटा पानी लाता हाथ धुलवाता
सामान समेट कर थैले में रखता
कभी कभी ऐसा भी होता था
कि किसी के घर
कचहरी की बस रवाना होने तक
खाना बनने में देर होती दिखती थी
तो वह दूसरे से कहता था
आज म्हारी भी रोट्यां बणवा लीज्यो
और कभी कभी ऐसा भी
कि विरोधी पक्ष का वकील किसी भाई को
कुछ भला बुरा कहता था
तो दोनों उससे झगड़ पड़ते थे
लौटते समय भी दोनों एक साथ लौटते थे
एक ही बस से एक ही सीट पर बैठकर
और बस से उतरकर
बातें करते हुए घर पहुंचते थे
गांव के लोग देखते थे कि आते जाते छोटका
बड़े का थैला भी खुद के कंधे पर टांगे रहता था
©विनोद पदरज
Vinod Padraj