मातेचा लाल- १७

मातेचा लाल- १७

एक बोधकथा

मातेचा लाल-१७

भारतमातेने पाहिले, 
जत्रेत एक पोर एकटे उभे आहे.
'रस्ता चुकलायस का?' 
भारतमातेने विचारले.
पोराने ना म्हणत डोके हलवले.
'तू हमीद तर नाहीस?!' 
भारतमाता म्हणाली.
पोर चमकले.
'तुम्ही मला कसे ओळखलेत?'
'आई आपल्या लेकराला ओळखणार नाही का? 
पण तू इथे एकटा काय करतोय? खिसा कापला गेला की मित्राची चुकामूक झाली? 
काय झाले?
भारतमातेने कुतूहलाने विचारले.
'मला माझ्या मित्रांनी मारले!'
हमीदचे गाल अजूनही लाल होते.
'मित्र असूनही मारतायत...असले कसले मित्र रे तुझे!!'
'ते माझे चांगले मित्र आहेत!'
हमीद निश्चयपूर्वक म्हणाला.
'मारल्यानंतरसुद्धा तू त्यांना आपले मित्र म्हणतोयस!'
'ते घाबरले होते!'
'का बरं?'
'मला मारण्यास त्यांना आमच्या बाईंनी सांगितले होते!'
'काय म्हणालास?!! बाईंनी??'
भारतमातेचा विश्वास बसेना.
'होय,मग ते बिचारे तरी काय करणार? 
हमीद निरागसपणे म्हणाला.
'पण का?'
'कारण बाईंचे म्हणणे होते की मी...मु..मु..'
हमीद पुढे बोलू शकला नाही.
भारतमातेने चटकन हमीदला मांडीवर उचलून घेतले आणि 
म्हणाली,'घाबरू नको! 
जसे मी तुला ओळखले,
त्यांनाही अवघ्या देशाने ओळखले आहे!!' 
तेव्हा तिची नजर हमीदच्या पिशवीकडे गेली.
तिने पिशवीत डोकावून पाहिले.
भारतमाता स्वतःशी बोलली,
'चिमटाच आहे!'
असे म्हणत भारतमातेने हमीदच्या कपाळाचा पापा घेतला.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी बोधकथा

माता के लाल - १७

भारत माता ने देखा मेले में एक बच्चा अकेला खड़ा है।
'रास्ता भूल गए हो!' भारत माता ने पूछा।
बच्चा ने न में सर हिलाया।
'तू कहीं हामिद तो नहीं!' भारत माता बोलीं।
बच्चा चौंका।
'आपने मुझे कैसे पहचाना!' 
'मां अपने बच्चे को नहीं पहचानेगी! मगर तू यहां अकेला क्या कर रहा! जेब कट गई या दोस्त बिछड़ गए हैं! क्या हुआ!' भारत माता ने जानना चाहा।
'मुझे मेरे दोस्तों ने पीटा!' हामिद के गाल अभी भी लाल थे।
'दोस्त होकर भी पीट रहें... कैसे दोस्त हैं तेरे!!'
'वे मेरे अच्छे दोस्त हैं!' हामिद दृढ़ता से बोला।
'पिटने के बाद भी तू उन्हें अपना दोस्त कह रहा!'
'वे डर गए थे!'
'क्यों भला!'
'मुझे पीटने के लिए उनसे हमारी टीचर ने कहा था!'
'क्या कहा!!! टीचर ने!!!' भारत माता को विश्वास न हुआ।
'जी, तो वे बेचारे क्या करते!' हामिद मासूमियत से बोला।
'मगर क्यों!!!'
'क्योंकि टीचर का कहना था कि मैं... मु... मु...' हमीद आगे न बोल सका।
भारत माता ने झट हामिद को गोद में उठा लिया और बोलीं,'घबरा मत! जैसे मैंने तुझे पहचान लिया, उनको भी सारे देश ने पहचान लिया!!!' तभी उनकी नजर हामिद के झोले पर गई।
उन्होंने झोले में झांका। 
भारत माता खुद से बोलीं,'चिमटा ही है!' यह कहते हुए उन्होंने हामिद के माथे को चूम लिया।

©अनूप मणि त्रिपाठी
Anoop Mani Tripathi 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने