किती काढाल ओकार्या
किती बडवाल टिर्या
एक एक योद्धा आमचा
करी ठिकर्या-ठिकर्या
तोफा बंदूका बारूद
आम्ही निर्मितो शब्दात
सत्य मांडू सत्य सांगू
जेते आम्हीच युद्धात
फुले-शाहू-आंबेडकर
पाया हलवून गेले
सनातनी साम्राज्याचे
मग छत कोसळले
गुलामीच्या पिंजर्याची
लेखणीने दाणादाण
कवी-लेखक-शाहीर
संशोधक वक्तागण
ज्ञानसत्र खुले केले
फिटे विटाळाचा भ्रम
प्रकाशाचा कण कण
करी काळोख खतम
चातुर्वण्याचे किटाळ
राज्यघटनेने हटवले
जातीधर्माच्या आडून
पुनःपुन्हा सुरू हल्ले
बुद्ध-गांधींच्या देशात
द्वेष किती फोफावला
धर्म-जातीच्या घृणेचा
उरी फेकतात भाला
वैदिकांना विकृतीची
नाही लाज ना शरम
विकृतीतच मरती
ज्यांचा विकृतीत जन्म
मृत्यूपश्चात वैरत्व
क्रूर वृत्तीचे लक्षण
संपविली देशातली
बंधूभावाची गुंफण
निंदकांना क्षमादान
हीच बुद्धशिकवण
छद्म कपट बुद्धीचे
तुम्ही मिरवा लांच्छन!
-भरत यादव
Bharat Yadav