झेंड्याचा सण

झेंड्याचा सण

झेंड्याचा सण

नाक्याच्या त्या पल्याड 
कैक संस्कृती
म्हातार्‍या झाल्यात
म्हातार्‍या झालेल्या संस्कृतींनी 
कधी
बघितलं नाही
झेंड्याचा सण साजरा करताना
आपल्या एखाद्या म्होरक्याला!

एका तेरा वर्षाच्या पोराने 
आत्ताच
चाखली द्रोणभर बुंदीची चव
जाणून घेतले तीन रंग का असतात
तिरंग्यात
'भगवा'' रंग पहिल्यांदाच ऐकून तो
जरासा चमकला!

गुरुजींनी सांगितलं,
हा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे
आपण एका संपूर्ण स्वतंत्र राष्ट्राचे नागरीक आहोत,
जिथे आपल्याला आपल्या मनासारखे जीवन 
निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे!

तेरा वर्षाचे पोर बघते आहे लक्षपूर्वक
तिरंग्याच्या मधोमध असलेले गोलचक्र
त्याला बैलगाडीची चाकं आठवतात
तीच बैलगाडी ज्यात त्याच्या बापाने
वाहून आणले होते
पोलिस जवानांचे सडलेले मृतदेह
त्याच्या भावाच्या प्रेतासोबत!

त्याची पंधरा वर्षाची बहिण आली होती 
शहरातल्या इस्पितळात
एके दिवशी शेजारी सांगत होता 
कुठल्याशा वर्तमानपत्रात त्याने
हिरवा गणवेश घातलेला 
रक्तबंबाळ अवस्थेतला
तिचा फोटो पाहिला आहे
सर्वजण म्हणतात,
ती लढाऊ बाई होती, 
मारली गेली!

गुरुजी ऐकवत होते,
अमर हुतात्म्यांचे बलिदान
कसे गुलामीचे साखळदंड तोडून 
आपल्याला मिळाले हे स्वातंत्र्य!

तेरा वर्षाचे पोर 
झेंड्याच्या पांढर्‍या रंगाला 
स्पर्श करू बघत होते
आपल्या हातांनी
त्याने आपली आया,
आपली आत्या
आपल्या काकूला बघितलं होतं
पांढर्‍या चादरीत एकाचवेळी 
निरोप घेताना,
जंगलात लांडग्यांनी त्यांच्यावर आक्रमण केले होते,
असे त्याच्या बापाने सांगितले!

गावातले सगळे पुरुष एकेदिवशी
अचानक गायब झाले.

शहरात जाऊन शिकत असलेला त्याचा मित्र 
समलूकडून पहिल्यांदा ठाऊक झाले त्याला 
सश्रम कारावासाच्या
शिक्षेच्या तुरूंगाचा पत्ता
त्याला हे माहित आहे
बीज पंडुम साजरा करताना गर्दीत
बदलून जायला नकोय गावाने!

गावातली हवा,
गावातले पाणी,
गावातली हिरवाई,
गावातली झाडे,
गावातली शेती
गावाची वेदना 
विस्थापित करता येऊ शकत नाही 
अन्य कुठल्या ठिकाणी!

कातकरी जाणून आहे
जंगलाचे दुःख सामुहिक दुःख आहे
तो स्वतःला शांतीपुंज क्रांतीकारी म्हणून जाहीर करताना आपल्या जिज्ञासू डोळ्यांनी लोकशाहीचे रक्षण करू पाहतो आहे!

तेरा वर्षाचे पोर विचारू पाहातेय
गुरुजीला प्रश्न
जिथे मृत्यू एक पर्व आहे,
तिथे
झेंड्याच्या सणाच्या नावावर
एक द्रोण बुंदी,
दोन बिस्किटं,
दोन समोशांनी सजलेल्या
डिस्पोजल प्लेटीचं नावच स्वातंत्र्य आहे का?

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

【झण्डा पंडुम】

नाका के उस पार 
'सभ्यताएं' बुढा गई हैं
बुढा गई सभ्यताओं ने कभी नहीं देखा 
'झण्डा पंडुम' मनाते 
अपने किसी नेतृत्वकर्ता को!

एक तेरह साल के बच्चे ने अभी- अभी
चखा दोनी भर बूंदी का स्वाद
जाना तीन रंग क्यों होते हैं तिरंगे में
'केसरिया' रंग पहली दफ़ा सुनकर वह थोड़ा चौक गया!

गुरुजी ने बताया यह आजादी का अमृत महोत्सव है
हम एक पूर्णतः आज़ाद देश के नागरिक हैं
जहाँ हमें अपनी मर्जी का जीवन चुनने की
पूरी आजादी है!

तेरह साल का बच्चा देखता है गौर से
तिरंगे के बीचों- बीच गोलचक्र
उसे बैलगाड़ी के पहिये याद आते हैं
वही बैलगाड़ी जिसमें उसके पिता ढोकर लाये थे 
पुलिस जवानों की सड़ी हुई लाशें
उसके भाई की लाश के साथ!

उसकी पन्द्रह साल की बहन आई थी शहर के अस्पताल 
एक दिन पड़ोसी कह रहा था किसी अखबार में उसने
हरी वर्दी पहनें ख़ून से सनी हुई उसकी तस्वीर देखी है
सब कहते हैं वह लड़ाकू महिला थी मारी गई!

गुरूजी सुना रहे थे अमर शहीदों की कुर्बानियां
कैसे गुलामी की जंजीर तोड़कर हमें मिली है यह आजादी 

तेरह साल का बच्चा झण्डे का सफेद रंग छूना चाहता है अपनी हथेलियों से 
उसने अपनी आया, अपनी अत्ता, 
अपनी काकी को देखा था
सफेद चादर में एक साथ विदा होते हुए
जंगल मे भेड़ियों ने उन पर आक्रमण कर दिया था
ऐसा उसके बाप ने बताया!

गाँव के सारे मर्द एक दिन अचानक गायब हो गए

शहर जाकर पढ़ने वाले उसके दोस्त समलू की ज़ुबान से पहली दफा जाना उसने सश्रम कारावास की सजा वाली जेल का पता
उसे यह पता है 'बीज पंडुम' मनाते हुए भीड़ में नहीं बदलना चाहिए गाँव को!
 
गाँव की हवा, गाँव का पानी, गाँव की हरियाली, गाँव का पेड़, गाँव का खेत, गाँव का दर्द विस्थापित नहीं किया जा सकता कहीं और!

'कातिकार' जानता है जंगल का दुःख सामूहिक दुःख है
वह खुद को 'शांतिपुंज क्रांतिकारी' घोषित करते हुए 
अपनी जिज्ञासु आँखों से लोकतंत्र की रक्षा करना
चाहता है!

तेरह साल का लड़का पूछना चाहता है गुरुजी से सवाल 
जहां मृत्यु एक पर्व है, वहाँ 'झण्डा पंडुम' 
के नाम पर एक दोनी बूंदी, दो बिस्कुट, दो समोसा से सजी हुई डिस्पोजल प्लेट का नाम ही आजादी है क्या? 

पूनम वासम 
©Poonam Wasam
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने