हे राम,
जीवन एक कटुसत्य आहे
आणि तू एक महाकाव्य!
तुझ्या आवाक्यातला नाही
त्या अविवेकावरचा विजय
ज्याचे दहा-वीस नाही
आता लाखो डोकी-
आहेत लाखो हात
आणि बिभीषणाचीसुद्धा आता
कुणास माहित
आहे कुणाला साथ
याहून अधिक काय असू शकते
आमचे दुर्दैव
एका वादग्रस्त स्थळात
आक्रसून
गेले तुझे साम्राज्य
अयोध्या सध्या तुझी अयोध्या नाही,
योद्ध्यांची लंका आहे
'मानस' तुझे 'चरित्र' नाही
निवडणुकीचा डंका आहे!
हे रामा,कुठे गेला काळ
कुठे तुझे ते त्रेता युग
कुठे तू मर्यादापुरुषोत्तम
आणि कुठे हे नेता युग!
नम्र विनंती आहे देवा,
आता माघारी जावा
पुराणात किंवा
कुठल्याशा धर्मग्रंथात
सकुशल आणि सपत्नीक
आताचे अरण्य ते अरण्य नाही
ज्यात फिरायचे ऋषी वाल्मिक!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
अयोध्या,१९९२
हे राम,
जीवन एक कटु यथार्थ है
और तुम एक महाकाव्य!
तुम्हारे बस की नहीं
उस अविवेक पर विजय
जिसके दस बीस नहीं
अब लाखों सर - लाखों हाथ हैं,
और विभीषण भी अब
न जाने किसके साथ है।
इससे बड़ा क्या हो सकता है
हमारा दुर्भाग्य
एक विवादित स्थल में सिमटकर
रह गया तुम्हारा साम्राज्य
अयोध्या इस समय तुम्हारी अयोध्या नहीं
योद्धाओं की लंका है,
'मानस' तुम्हारा 'चरित' नहीं
चुनाव का डंका है!
हे राम, कहाँ यह समय
कहाँ तुम्हारा त्रेता युग,
कहाँ तुम मर्यादा पुरुषोत्तम
और कहाँ यह नेता-युग!
सविनय निवेदन है प्रभु कि लौट जाओ
किसी पुराण - किसी धर्मग्रंथ में
सकुशल सपत्नीक...
अबके जंगल वो जंगल नहीं
जिनमें घूमा करते थे वाल्मीक!
©कुंवर नारायण