🚩
दिल्लीत शिजला
आजचा निर्णय
नग्न अनुनय
निर्लज्जांचा
होता ठरलेला
आधीच निकाल
विलंबाचा खेळ
रंगलेला
दिरंगाई तुझे
नार्वेकर नाव
फितुरीचा घाव
आरपार
आधी दिरंगाई
तुझी खोकेबाई
आता दांडगाई
विधीवत
जाहली अखेर
चोरांची सरशी
अध्यक्ष खुनशी
नेमलेला
घराचा मालक
केलासे बेघर
मातले गद्दार
मातोश्रीचे
बसली बोकांडी
आता पेशवाई
थोर शिंदेशाही
देई साथ
श्राद्ध घाला आता
मर्हाटी बाण्याचे
गुज्जर घाण्याचे
व्हा रे बैल!
🚩
-भरत यादव
Bharat Yadav