मी एक मुस्लिम अल्पसंख्याक आहे

मी एक मुस्लिम अल्पसंख्याक आहे

मी एक मुस्लिम अल्पसंख्याक आहे

मी या देशात अल्पसंख्याक आहे
मला कुठल्याही कारणाविना 
मारुन टाकले जाते
मी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींसाठी 
जास्त प्रसिद्ध आहे
मी बहूसंख्यांकांसाठी खूप अधिक आहे 
आणि सत्तेकरिता केवळ 
एक मतपेढी.

मी मागील सत्तर वर्षांपासून अल्पसंख्य राहिलो आहे
आर्थिकदृष्ट्या पण आणि
जनगणनेतदेखील.
मी अद्यापही अशा राजकीय पक्षाच्या शोधात आहे 
जो मला बरोबरीचा दर्जा देऊ शकेल.
मी संसदेत,
प्रत्येक मंचावर नावापूरता उरलोय
मी अजूनही प्रधानमंत्री होण्याचे 
स्वप्न पाहू शकत नाही
मी तोपर्यंतच स्विकारार्ह आहे 
जोपर्यंत सत्तेतील भागिदारीसाठी दावा 
करीत नसतो,
मी बहूमताचा चांगला मित्र आहे 
जोवर मी एक दबलेला व्यक्ती आहे,
माझे बहूसंख्यांक मित्र मला 
धाडसी मानतात,
मात्र मी समतेचा दावा केला की
बहूसंख्यांक मला सांगत असतात
लोकशाही काय असते ते
आणि धर्मनिरपेक्षता म्हणजे काय?
जर मी सहमत असलो तर 
ते मला एक चांगला मुसलमान समजतात
आणि जर का नसेन,
तर मी एक दहशतवादी ठरतो!
मीच ती व्यक्ती आहे 
ज्याच्यावर सेक्युलर असण्याचे ओझे आहे
माझा बुरखा त्यांना घाबरवतो
माझा पोषाख त्यांना भयभीत करतो
ते माझ्याकडून शिजवलेले अन्न खातात तरिही,
मला त्यांच्या स्वयंपाकघरात जाण्याची परवानगी नाही.

मी या महान राष्ट्रात एक 
मुस्लिम अल्पसंख्यांक आहे
मला तुरुंगात डांबता येऊ शकते
मारता येऊ शकते
बुलडोझरने चिरडून टाकता
येऊ शकते
सगळे बिनबोभाटपणे.

माझे प्रेम एक गुन्हा आहे
माझा जन्म 
एक घोडचूक आहे
माझ्याकडे आवाज आहे
पण ते माझे ऐकू शकत नाहीत
मी एक भारतीय मुस्लिम आहे
आणि मी अजूनही त्यांच्या 
राजकीय दृष्टीकोनातून वन-लाइनर आहे

मी 
विकासात भागीदारीचा दावा 
करु शकत नाही
मी इथे आहे तरी पण इथे नाही
मला कधी कधी विचारले जाते
की 
काय
मी बांगलादेशी आहे की पाकिस्तानी?

मी स्वतःची राष्ट्रभक्ती सिद्ध करता करता थकून गेले आहे
मला
जिहादी,लांड्या,मुल्ला,बांगलादेशी,
मियाॅं वगैरे वगैरे अशा संबोधनाने हाक मारलेले
ऐकून थकून गेलेय
मी झुंडबळी ठरेन भारत जिंकले तरी
मी झुंडबळी ठरेन पाकिस्तान जिंकले तरी
जर कुणी नाही जिंकले तरिदेखील मीच झुंडबळी ठरेन!
मी या महान राष्ट्रात मुस्लिम अल्पसंख्यांक आहे.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ इंग्रजी कविता

Today is World Minority Rights Day, so here is a poem on the Rights the Muslim Minority enjoys in this great country:

I’m a Muslim Minority

I’m the minority in this land
I’m lynched without explanation 
I’m known more for my food habits
I’m too much for the majority 
and just a vote bank for the power.

I’ve been a minority for the last seventy years
Both financially and in the census
I’m still searching for the political party
which will find me equal
I’m reduced to a token
in parliament, in every platform 

I still can't dare to dream of becoming prime minister
I’m palatable till I don't claim a stake in power
I’m a good friend to the majority till I am a subdued entity
my majority friends find me audacious
If I claim equality 

The majority tell me
what democracy is
and what is secularism
if I agree they call me a good Muslim
if not, I am a terrorist!

I'm the one who has the burden to carry the bag of being secular
my burqa frightens them
my attire horrifies them
they devour the foods I cook 
but still, I am not allowed in their kitchens

I’m a Muslim minority 
in this great nation
I can be jailed
can be killed
can be bulldozed
all in silence.

My love is a crime 
my birth is a fatal mistake 
I have voice
but they can't hear me
I’m an Indian Muslim
and I'm still the one-liner in their political vision.

I can't claim a share in the development 
I’m here still not here
I’m asked now and then
Am I a Bangladeshi or a Pakistani?

I’m tired of proving my patriotism
I’m exhausted of name callings-
Jihadi, katua, mullah, Bangladeshi, Miya and so on
I’m lynched if India wins
I’m lynched if Pakistan wins
I’m lynched even if no one wins
I’m Muslim minority in this great nation.

©मौमिता आलम
Moumita Alam 
18-12-2024

Artwork courtesy 
আश्रনখ সমুদ্দুর
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने