संसदेत शहाजोगपणे मुर्ख बरळले
सूर्यावर थुंकण्याचे पुन्हा प्रयत्न झाले
अन् त्यांचेच थोबाड घाणीत बरबटले,
गटारीच्या!
टायघाले-मायघाले तिथे एक झाले
सत्तेच्या शेणापायी बापाला विसरले
देशबुडव्या वैर्याला साथ देऊ लागले,
संसदेत!
लोभाच्या जंगलात,दलदलीत गेले
स्वाभिमानी चित्ते जिथे ठार मेले
संघसत्तेचा हा असा सारीपाट चाले,
अव्याहत!
अंगार माणसे थंड-षंढ झाली
जातीची नाही उतरंड संपलेली
सनातनी पिलावळ बलदंड केली,
आपणच!
पाप आणि पुण्यात अडकली अक्कल
देवाधर्मापल्याड काही सुचेना शक्कल
विज्ञानवैर्यांची घोर थोतांडी फतकल,
भारतात
महामानवांची नाही ज्यास जाण
संविधानद्रोही मानती ईश्वर महान
श्रद्धा-अंधश्रद्धेचे हे युद्ध सनातन,
निकराचे!
-भरत यादव
Bharat Yadav