🚩
पोथ्या-पुराणांचे पारायण
हे मनुस्मृतीचेच अनुसरण
खर्या संतांची शिकवण
विसरती!
विज्ञानयुगात वावरती,पण
अंधारयुगातच लडबडती
ऐसे ढोंगी स्वतःस मानती
धर्मवंत!
इये पोथीनिष्ठांची मांदियाळी
नारीप्रतिष्ठा तुडवती पायदळी
कर्मकांडीय वैदिकांची टोळी
मातलीसे!
ऐसे कैसे बा हे गुरुचरित्र?
स्त्रीविटंबनेला मानते पवित्र
विषमतेचे घृणास्पद सूत्र
शिकवते!
अंधपणाने पोथीवाचन
मुर्खपणाचेच प्रदर्शन
निकोपमनाचे हे लक्षण
नाही नाही!
ऐशा विकृतीचा क्षय व्हावा
समतावृत्तीचा उदय व्हावा
सर्वांप्रती सन्मान वाढावा
इथे नित्य!
🚩 -भरत यादव
Bharat Yadav