वगैरे

वगैरे

वगैरे..

काही लोकांच्या नावाचा उल्लेख केला गेला होता,
ज्यांची पदं होती
इतर सगळे वगैरे होते.
वगैरे संख्येने नेहमीच अधिक असत.
वगैरे मोलभाव करुन भाजीपाला खरेदी करीत आणि जेवणबिवण करुन खास लोकांची भाषणं ऐकायला जात असत.
वगैरे प्रत्येक चर्चासत्रात 
उपस्थिती वाढवायचे.
वगैरे मिरवणुकीत जायचे,
फलक उंचावत घोषणा द्यायचे.
लांबलचक रांगांमध्ये उभे राहून मतदान करायचे.
त्यांचा सतत असा भ्रम करुन दिला जायचा की तेच या लोकशाहीमध्ये सरकार बनवीत असतात.
वगैरे नेहमीच आंदोलनात सहभागी व्हायचे.
त्यामुळे कधीकधी पोलिसाच्या गोळीने मारले जायचे तेव्हा
त्यांची ती नावंसुद्धा आम्हाला सांगितली जायची, 
जी शाळेत प्रवेश घेताना ठेवलेली होती किंवा ज्यामुळे त्यातील काहीजण पगार खात होते.
काहीजण तर अशा घटनांमध्येही वगैरेच राहायचे.
वगैरे खरे तर कुठलीही जोखीम उचलायलाही घाबरायचे पण कधीकधी जेव्हा ते घाबरणे सोडून द्यायचे, 
तेव्हा इतर सगळे त्यांना 
घाबरत असत.
वगैरे हेच करण्यासारखी 
सगळी कामे करायचे, 
ज्यामुळे देश आणि जग चालत होते परंतू त्यांना असे वाटायचे की 
ते सर्व कामे फक्त आपले कुटुंब चालविण्यासाठी करताहेत.
वगैरे प्रत्येक ठिकाणी सहभागी असायचे पण त्यांचे नाव कुठेही
नाही दिसायचे.
वगैरे फक्त काही वेड्या कवींच्या कवितांमधून बहुतेकदा आढळायचे.

मूळ हिंदी कविता

इत्यादि 

कुछ लोगों के नामो का उल्लेख किया गया था 
जिनके ओहदे थे बाकी सब इत्यादि थे।
इत्यादि तादात में हमेशा ही ज्यादा होते थे।
इत्यादि भाव ताव कर के सब्जी खरीदते थे 
और खाना वाना खा कर खास लोगों के 
भाषण सुनने जाते थे। 
इत्यादि हर गोष्ठियों में उपस्थिति बढ़ाते थे ।
इत्यादि जुलूस में जाते थे।
तख्तियां उठाते थे नारे लगाते थे इत्यादि लम्बी लाइनों में लग कर मतदान करते थे।
उन्हें लगातार ऐसा भ्रम दिया गया था कि वो ही इस लोकतंत्र में सरकार बनाते थे।
इत्यादि हमेशा ही आन्दोलनों में शामिल होते थे 
इसलिए कभी कभी पुलिस की गोली से मार दिए जाते थे। जब वे पुलिस की गोली से मार दिए जाते थे तब उनके वो नाम भी हमें बतलाये जाते थे जो स्कूल में भरती करवाते समय रखे गए थे या जिससे उनमे से कुछ पगार पाते थे कुछ तो ऐसी दुर्घटना में भी इत्यादि रह जाते थे। 
इत्यादि यूँ तो हर जोखिम से डरते थे लेकिन 
कभी - कभी जब वो डरना छोड़ देते थे 
तो बाकी सब उनसे डरने लगते थे। 
इत्यादि ही करने को वो सारे काम करते थे जिनसे देश और दुनिया चलती थी हालाँकि उन्हें ऐसा लगता था कि वो ये सारे काम सिर्फ अपना परिवार चलाने को करते हैं। इत्यादि हर जगह शामिल थे पर उनके नाम कहीं भी शामिल नहीं हो पाते थे। 
इत्यादि बस कुछ सिरफिरे कवियों की कविता में अक्सर दिख जाते थे।

©राजेश जोशी
Rajesh Joshi

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने