प्रेमपत्रं

प्रेमपत्रं

प्रेमपत्रं

मी आयुष्यात 
कितीक प्रेमपत्रं लिहिली
पण ती तिथंवर पोहोचली नाहीत
जिथं त्यांना पोहोचायला हवं होतं
आपल्या इच्छित स्थळापासून
दुरावलेली ती तमाम प्रेमपत्रं
आजही सुरक्षित आहेत माझ्याजवळ.

मला पश्चाताप नाही
आपल्या या बेवारस प्रेमपत्रांबाबत
कुठेही न जाता त्यांनी 
पहिल्यांदा मला लिहिलं आणि 
मग एकत्र येऊन सगळे फैलावले
प्रत्येक दिशेला
आता कुणीही नाहीये 
माझ्या इच्छांच्या 
माझ्या संवेदनांच्या
आणि 
माझ्या पकडीच्या बाहेर

आणि अशाप्रकारे
आयुष्याच्या कुठल्याही काळात
प्रेमाच्या शक्यतांच्या पल्याड
मी स्वतःदेखील नाही.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

मैंने जीवन में कितने प्रेमपत्र लिखे
लेकिन वे वहां तक नहीं पहुंचे
जहां उन्हें पहुंचना चाहिए था
अपने गंतव्य से बिछुड़े वे तमाम प्रेमपत्र
सुरक्षित हैं मेरे पास आज भी

मुझे अफसोस नहीं
अपने इन लावारिस प्रेमपत्रों के लिए
कहीं नहीं जाकर इन्होंने
पहले मुझे लिखा
और फिर एक साथ फैल गए
हर दिशा में
अब कोई भी नहीं है मेरी इच्छाओं
मेरी संवेदनाओं
और मेरी पहुंच के बाहर

और इस तरह
जीवन के किसी भी दौर में
प्रेम की संभावनाओं के बाहर
मैं स्वयं भी नहीं हूं।

©ध्रुव गुप्त
Dhruv Gupt 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने