बाबू झोपला का?
विचारले तिने फोनवर
हो झोपला
आत्तापर्यंत जागा होता,
तुमची वाट बघत होता
आत्ताच झोप लागलीय.
काय करणार गाडी चार तास लेट आहे,
दोन वाजता पोहोचेल,
सूनबाईला सांग स्वयंपाक करुन ठेवेल,
कुठंवर जागत बसेल
आणि तू पण झोपी जा,
येऊ आम्ही रिक्षाने
ती म्हणाली.
जिने माझ्या पत्नीसारखीच
प्लाजो कुर्ती घातली होती
ओढणी पांघरली होती.
वरती बर्थवर एकजण
झोपलेला होता
कदाचित ताप होता अंगात त्याच्या
ती पुनःपुन्हा त्याच्या माथ्याला
स्पर्श करीत होती आणि
पाण्याने पुसत होती.
जेव्हा तिचे स्टेशन आले
तिने माझ्या पत्नीप्रमाणेच
नी कॅप घातला
आधार देऊन माणसाला उतरवले
मग सामान घेऊन उतरली.
जर बर्थवरुन उतरताना त्या माणसाच्या तोंडून
'या अल्लाह' निघाले नसते
तर मला कधी कळले नसते.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
मुसलमान
बाबू सो गया क्या
पूछा उसने फोन पर
हाँ सो गया
अभी तक जग रहा था आपका इंतज़ार कर रहा था
अभी अभी नींद आ गई
क्या करें गाड़ी चार घंटे लेट है दो बजे पहुंचेगी
बहू से कह दो खाना बना कर रख देगी
कब तक जगेगी
और तुम भी सो जाओ हम आ जायेंगे ऑटो लेकर
कहा उसने
जिसने मेरी पत्नी की तरह ही
प्लाजो कुर्ता पहन रखा था
दुपट्टा ओढ़ रखा था
ऊपर बर्थ पर एक आदमी सोता था
शायद ज्वर था उसे
वह घड़ी घड़ी उसका माथा छूती थी
और पानी की पूछती थी
जब उसका स्टेशन आया
उसने मेरी पत्नी की तरह ही नी कैप पहना
सहारा देकर आदमी को उतारा
फिर सामान समेट कर उतर गई
अगर बर्थ से उतरते हुए उस आदमी के मुँह से
या अल्लाह न निकला होता
तो मुझे कभी पता नहीं चलता।
©विनोद पदरज
Vinod Padraj