आदिवासी आणि लोकशाही

आदिवासी आणि लोकशाही

आदिवासी आणि लोकशाही
/ हिमांशु कुमार

नागडे उघडे आदिवासी
घनदाट जंगलात झांडांमध्ये
स्वतःही झाडांसारखेच
बस्स असेच जगतायत
कारण नसताना हसतात
खी खी करीत
ओळखपाळख नसताना
तुम्हांला पाहून उभे राहतात

वाकून बोलतात
बोलतात कमी हसतात जास्त

मोहाच्या झाडाखाली जन्मतात
मोहाच्या झाडाखाली नाचतात
मोहाच्या झाडाखाली झोपतात
एक दिवस मोहाच्या झाडाखालीच 
दफन होऊन जातात

फुलं जशी फुलतात जंगलात
आणि त्यातच मिसळून जातात
नेमकं एखाद्या फुलाप्रमाणं

अचानक चालल्या गोळ्या
मोहाच्या झाडासमोर हात जोडून
बसलेले आदिवासी
रक्त रक्त
घ्या पोहोचले बघा सभ्य लोक!
आदिवासींच्या मध्ये
पोहोचताच केला स्फोट

केले पोस्टमार्टेम
या उघड्यानागड्या आदिवासींचे
पोट फुगले होते
फवारा उडाला
फोट फाडल्याने

या फवार्‍यात भिजून गेला
भारताचा महान धर्म
भारताचा आत्मा
भारताचा सन्मान

आता दिल्लीत वंचितांच्या काळजीच्या नावावर
यांचा मारेकरी सन्मानित केला जाईल,

आपण गौरवगाथा गाऊ
आपल्या मारेकरी सैनिकांची

आपली संसद 
आपले सर्वोच्च न्यायालय
लोकशाही संविधान

या आदिवासींपर्यंत अद्याप 
हे शब्दसुद्धा पोहोचलेले नाहीयेत

खरीखुरी लोकशाही पोचण्यास
अजूनतरी शतके लागतील.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

नंग धडंग आदिवासी  
घने जंगल में पेड़ों के बीच में 
खुद भी पेड़ों जैसे 
बस ऐसे ही जीते हैं 
बिना बात हँसते हैं 
खी खी कर के 
बिना जान पहचान 
आपको देख कर खड़े हो जाते हैं 

झुक कर बात करते हैं 
बातें कम करते हैं हंसते ज़्यादा हैं 

महुआ के नीचे पैदा होते 
महुआ के नीचे नाचते 
महुआ के नीचे सोते 
एक दिन महुआ के नीचे दफ़न हो जाते हैं 

फूल जैसे खिलते हैं जंगल में 
और उसी में मिल जाते हैं 
बिल्कुल एक फूल की तरह 

अचानक चली गोलियाँ  
महुआ के पेड़ के सामने हाथ जोड़ कर बैठे 
आदिवासी खून खून 
लो पहुँच गये सभ्य लोग
आदिवासियों के बीच  
पहुँचते ही किया धमाका 

किया पोस्ट मार्टम 
इन नंग धडंग आदिवासियों का 
पेट फूल गया था 
फुहारा निकला 
पेट चीरने से 

इस फुहारे से भीग गया 
भारत का महान धर्म 
भारत की आत्मा 
भारत का गौरव 

अब दिल्ली में वंचितों की चिन्ता के नाम पर 
इनका हत्यारा सम्मानित किया जायेगा,

हम गौरव गाथा गायेंगे 
अपने हत्यारे सैनिकों की 

हमारी संसद 
हमारा सर्वोच्च न्यायालय 
लोकतंत्र संविधान 

इन आदिवासियों तक 
अभी यह शब्द भी नहीं पहुंचे हैं 

सचमुच का लोकतंत्र पहुंचने में तो 
अभी सदियां लगेंगी

©हिमांशु कुमार
Himashu Kumar
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने