हा देश मरुन गेला आहे आता
देवाच्या भरवशावर आहे हा देश
अशा देवाच्या भरवशावर
ज्याच्यावरुन
वादविवाद सुरू आहे देशात
देव आहे की नाही यावरुन
ज्यांच्यासाठी देव आहे
ते मंदिराला प्रदक्षिणा घालताहेत
इबादत,कन्फेशन,नैवेद्य,भंडारा
करण्यात
ज्यांचे सगळे आयुष्य,
सगळी कमाई खर्च झाली आहे
ते उत्तम जीवन आणि संपत्तीसाठी
आकाशाकडे डोळे लावून बसलेत
आरत्या गाताहेत
नगारे वाजवताहेत
आणि बहिरा देव
प्रदीर्घ श्वास घेऊन झोपी गेलाय,
ज्यांच्यासाठी देव नाही
ते व्यवस्थेला दोन शिव्या हासडतात
आणि आपले अस्तित्व दाखवतात,
शिव्या ते अशा क्लृप्तीने आणि
अशा शैलीत देतात
की त्या शिव्या
व्यवस्थेपर्यंत पोहोचू नयेत
पण त्यांची गणना क्रांतिकारकांमध्ये होत राहावी
व्यवस्थेचा ताबा घेतलेले लोक
अशा क्रांतिकारकांना जाणतात
आणि हसतात,
मुळमुळीत क्रांतिकारक
बुळबुळीत क्रांती करतात
ताबा घेतलेले लोक
हे चांगलेच जाणतात,
वादाचे जिवंत विषय मरुन गेलेत
जिवंत लोक मेलेले आहेत कारण,
बोलण्याच्या गुन्ह्यात
तुरुंगात सडत असलेल्यांच्या
बाजूने उभे आहेत मूठभर लोक
आणि गर्दी
प्रार्थनास्थळांमधील प्रार्थनेत दंग आहे,
दुमदुमत आहे भक्तीनाद
'एकटे आलो होतो एकटेच जाऊ
पुढचा जन्म सांभाळा
हा जन्म तर पापयोनी आहे'
व्यक्तीला व्यक्तीशी झुंजवणारी
व्यक्तीला व्यक्तीपासून तोडणारी व्यवस्था जाणते की
कणाहीन बुद्धिजीवी लोकांच्या भरवशावर
कुठलीच क्रांती कधी यशस्वी ठरत नाही.
कणाहीन मृत लोकांचे देश
जेव्हा जळत असतात
तेव्हा तिथला राजा
बासरी वाजवत असतो,
कणाहीन मृत लोकांचे देश
जेव्हा मरत असतात
तेव्हा तिथले शासक
डमरू वाजवत असतात.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
ये मुल्क मर चुका है
ये मुल्क मर चुका है
अब ईश्वर भरोसे हैं यह मुल्क
उस ईश्वर के भरोसे
जिस पर बहस जारी है मुल्क में
कि ईश्वर है या नहीं
जिनके लिए ईश्वर है
वे देवालयों के चक्कर काट रहे हैं
इबादतें ,कन्फेशन, स्वामणि, चौकी भरने में
जिनकी पूरी जिंदगी, पूरी आमदनी लग चुकी है
वे बेहतर जीवन और धन के लिए
निहार रहे हैं आसमान
गा रहे हैं आरतियां
पीट रहे हैं नगाड़े
और बहरा ईश्वर
लंबी तान कर सोया है,
जिनके लिए नहीं है ईश्वर
वे व्यवस्था को दो गाली निकाल लेते हैं
और अपने होने की हाजिरी लगा देते हैं,
गाली वे इस तरकीब और इस लय में निकालते हैं
कि व्यवस्था तक न पहुंचे वह गाली
और उनकी गिनती क्रांतिवीरों में होती रहे
व्यवस्था पर काबिज लोग
ऐसे क्रांतिवीरों को जानते हैं
और मुस्कुरा देते हैं,
लिजलिजे क्रांतिवीर
लिजलिजी क्रांति रचते हैं
काबिज लोग बेहतर जानते हैं,
बहस के जिंदा विषय मर चुके हैं
जिंदा लोग मर चुके हैं क्योंकि,
जेलों में रिस रहे हैं जो बोलने के जुर्म में
उनके पक्ष में खड़े हैं मुट्ठी भर लोग
और भीड़ देवालयों में प्रार्थनरत है,
गूंज रहे हैं भक्तिनाद
कि अकेले आए थे अकेले जाओगे
अगला जन्म संवार लो
यह जन्म तो पाप की जूनी है
व्यक्ति से व्यक्ति को लड़वाती
व्यक्ति को व्यक्ति से अलग करती व्यवस्था
जानती है
बिना रीढ़ के बौद्धिक लोगों के भरोसे
कोई क्रांति कभी फलीभूत नहीं होती।
रीढ़ विहीन मृत लोगों के मुल्क
जब जल रहे होते हैं
तब वहां के राजा बांसुरी बजा रहे होते हैं,
रीढ़ विहीन मृत लोगों के मुल्क
जब मर रहे होते हैं
तब वहां के शासक डमरू बजा रहे होते हैं।
©वीरेन्दर भाटिया
Virender Bhatia