आम्ही धर्म जिंकले,
देश जिंकले,
पदके जिंकली,
निवडणुका जिंकल्या,
माणुसकीपुढे मात्र हरलो, माझे पोरी.
आम्हाला माफ कर,
कारण आम्ही
तुझ्यासाठी राहण्यालायक देश बनवू शकलो नाही,
जिथे दिवस असो वा रात्र,
कोणत्याही वेळी तू निर्भयपणे रस्त्यावरून
फिरू शकशील असा.
आम्ही विकल्या गेलेल्या
मानवतावाल्या देशाचे नागरिक आहोत.
आधी स्वतः विकले जाऊ,
मग तुलाही विकू
आम्ही पुस्तकांत,
धर्मग्रंथांत,
चित्रपटांत किंवा रील्समध्ये कामुकता भरली नाही,
ती आमच्या डोक्यात भरलीये.
ज्याचा आता दर्प सुटला आहे.
आम्ही जगातले सर्वांत विकृत मानसिकतेचे पुरुष आहोत. वासनेने भरलेली,
चालती-बोलती स्फोटके आहोत आम्ही,
ज्यांच्यापासून
प्रत्येक मुलीला धोका आहे.
आम्ही संकुचित धर्म,
संकुचित विचार,
संकुचित माणुसकी घेऊन जिवंत आहोत आणि निर्लज्जपणे स्वतःला प्रगत,
विकसित म्हणवत आहोत.
आमच्या विकासावर,
आमच्या प्रगतीवर,
आमच्या चारित्र्यावर संशय घेऊनच तू बाहेर पड,
माझे पोरी.
हा देश नीच पुरुषांनी गच्च भरलेला आहे.
इथला पुरुष,
स्त्रियांच्या बाबतीत,
भरवसा ठेवण्याच्या लायकीचा अजिबात उरलेला नाहीये.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
हमें माफ़ कर देना मेरी बच्ची
हमें माफ कर देना मेरी बच्ची
हमने धर्म जीते
मुल्क जीते
मेडल जीते
चुनाव जीते
मनुष्यता से हार गए मेरी बच्ची
हमें माफ कर देना
कि हम, तुम्हारे रहने लायक मुल्क नहीं बना पाए
जहां दिन और रात किसी भी समय
सड़क पर बेखौफ घूम सको तुम
हम बिकी हुई मनुष्यता वाले मुल्क के नागरिक हैं
पहले खुद बिकेंगे
फिर तुम्हे बेचेंगे
हमने किताबों, ग्रंथों, चलचित्रों, रीलों में कामुकता नहीं भरी
जेहन में भरी है
जो अब सड़ांध मारने लगी है,
हम विश्व की सबसे बड़ी विकृत मानसिकता वाले पुरुष हैं
हम कामुकता से भरे चलते फिरते विस्फोटक है
जिनसे हर बच्ची को खतरा है
हम संकुचित धर्म
संकुचित सोच
संकुचित मनुष्यता लेकर
जीवित हैं
और बेशर्मी से उन्नत और विकसित कहते हैं खुद को
हमारे विकास पर
हमारे उन्नत होने पर
हमारे चरित्र पर
तुम शक करके बाहर निकलना मेरी बच्ची
यह मुल्क
दुष्चरित्र पुरुषों से अटा पड़ा है
यहां का पुरुष
स्त्री के संदर्भ में
विश्वास के काबिल कत्तई नहीं है।
©वीरेंदर भाटिया
Virender Bhatia