जमिनीने कधी पिकांना दुसऱ्या ग्रहावर माघारी जाण्यास सांगितले नाही,
ना नद्यांनी सरोवरांना दूरदेशी समुद्रात विलीन व्हायला सांगितले जंगलांनी पक्ष्यांना अरबस्तानच्या वाळवंटात हाकलून नाही लावले, ना वाऱ्याने वादळांना दिशा बदलायला कधी भाग पाडले.
पण माणसांनी रक्ताचा वास घेत नागरिकत्व वेगळे केले.
काही घेण्यासाठी येण्यापेक्षा कुठेतरी राहण्यासाठी येणे अधिक सुंदर असते.
सगळेच कुठून ना कुठून तरी आलेले असतात, किमान आईच्या गर्भातून तरी.
त्यांचा धर्म निर्गुणी, शीख आणि आर्यसमाजींप्रमाणे मूर्तिपूजेचा विरोध करणारा होता, पण त्यांनी आता गाय, नदी, पिंपळ या सर्वांना माय मानले आहे. आता त्यांना मुसलमान म्हणून वेगळे कसे कराल?
त्यांना इतक्या वेळा येथून निघून जाण्यास सांगितले गेले आहे की आता ते या जगातूनच निघून जावू पाहातायत.
किल्ल्यांच्या, धर्मशाळांच्या, दर्ग्यांच्या कमानींवर फडफडणार्या हिरव्या-लाल चिंध्या सांगताहेत की त्यांनी शरणागती पत्करली आहे.
जे पूर्वज त्यांचे नव्हतेच, त्यांच्या चुकांसाठीही त्यांनी माफीसुद्धा मागितली आहे.
त्यांचे अस्तित्व त्या मशिदीसारखे थरथरत आहे जिला कधीही बुलडोझरने पाडले जाऊ शकते. त्यांचा विश्वास त्या कब्रस्तानांसारखा घाबरलेला आहे ज्यांना कधीही उखडून टाकले जाऊ शकते.
त्यांना वाटते की त्यांचे कसायाचे काम कोणीतरी हिंदूने करावे आता. ते आता पिंपळ तोडण्याइतकेही मुसलमान राहू इच्छित नाहीत. कुरानातील आयतींसारखे ते पुटपुटत राहतात — आमचे आजोबा-पणजोबा अनेक पिढ्यांपासून इथलेच आहेत.
इथेच त्यांनी शालींवर, गालिच्यांवर आपल्या दारिद्र्याचे चंद्र-तारे विणले, इथेच कुर्त्यांवर नक्षीकाम केले,
इथेच आपल्या जखमा शिवल्या.
ते सतार, सनई किंवा तबल्यातील एखाद्या सुरासारखे, तालासारखे स्वतःला विसर्जित करून कितीतरी घराण्यांचे स्वर बनले.
कोणकोणते राग आपण वेगळे काढून पाकिस्तानला पाठवणार? कोणकोणत्या मिठायांमधून गोडवा काढून टाकणार?
कोणकोणत्या वस्त्रांवरील भरतकाम ओरबाडणार?
दंगलीनंतर छातीशी कवटाळलेल्या घाबरलेल्या मुलांना आईंनी इथेच स्थायिक झालेल्या संत-फकिरांच्या कथा सांगितल्या.
आपली मुलं आणि नातू गमावलेल्या वृद्धांनीही इथेच दोन हात कबरीसाठी जमिनीची प्रार्थना केली.
ते गेले नाहीत, वारंवार त्यांना जाण्यास सांगितले गेले,
तरी ते गेले नाहीत. फाळणीनंतर गेले नाहीत, १९६८ नंतरही गेले नाहीत. भागलपूर सोडून गेले नाहीत, फैजाबाद सोडून गेले नाहीत, गोध्रानंतर गेले नाहीत, मुजफ्फरनगरनंतर गेले नाहीत, शाहीनबाग आणि सीलमपूर सोडून गेले नाहीत.
प्रत्येक श्वासाबरोबर त्यांना सांगितले गेले — निघून जा.
गांधीजी मारले गेले तेव्हा त्यांच्याकडेच बोट दाखवले गेले. इंदिरा गांधी मारल्या गेल्या तेव्हाही पहिला संशय त्यांच्यावरच गेला.
कुठला बाहेरून हल्ला झाला की हमीदकडे गुन्हेगारासारखे पाहिले गेले.
भारत क्रिकेट सामना हरला तरी पाहिला गेला एका मुस्लिमाचा चेहरा.
रेल्वेच्या जनरल डब्यात आक्रसून बसलेल्या वृद्धाची शुभ्र दाढी ओढून म्हटले गेले — पाकिस्तानला जा. क्रिकेट खेळणाऱ्या मुलाचा गाल दाबून "जय श्रीराम" म्हणायला लावले गेले — पाकिस्तानला जा. स्वतःचा बचाव करणाऱ्या बुरखा घातलेल्या मुलींना, खोट्या खटल्यांत न्यायालयाचे उंबरठे झिजवणाऱ्या वृद्ध मातांना, सर्व शिव्याशाप दिल्यानंतरही अखेर सांगितले गेले — पाकिस्तानला जा.
त्यांच्याकडे अशा नजरेने पाहिले गेले जणू हा देशच त्यांचा नाही.
त्यांच्या निष्ठेचा वारंवार वास घेतला गेला. सर्वाधिक झडती त्यांच्या घरांचीच झाली. सीमेवर गोळी लागून मृत्यू पावलेल्या परवेजच्या विधवेलाही बोलले गेले.
देशाला कवडीमोलाने विकणाऱ्या पुढार्यांनीही सांगितले,
सौदेबाजी करताना सांगितले, पानाची पिचकारी टाकताना सांगितले,
दारूच्या गुळण्या करताना सांगितले, हातात डुक्कर घेऊन नाचताना सांगितले — पाकिस्तानला जा.
त्यांना पाकिस्तानची शिक्षा अशा प्रकारे सुनावली गेली जणू तो एखादा शेजारी देश नसून नरकाहूनही भयंकर जागा आहे. अशा प्रकारे त्यांच्या श्रद्धेला, त्यांच्या ईमानाला वारंवार कुरतडले गेले.
ते पिंजऱ्यातील पक्ष्यासारखे उडून जातील,
गेले तर विझत्या दिव्याच्या धुरासारखे जातील,
मरणाऱ्या शरीरातून निघून जाणाऱ्या श्वासासारखे जातील.
उरेल फक्त रिकामा पिंजरा,
रिकामा दिवा, रिकामे शरीर.
पण ते पाकिस्तानला गेले नाहीत.
ते पाकिस्तानला जाणार नाहीत.
[ कवीबंधू अदनान कफिल दरवेश करिता ]
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
वे जो पाकिस्तान नहीं गए
ज़मीन ने फसलों से कभी दूसरे ग्रह लौटने को नहीं कहा
न नदियों ने पोखरों को दूर देश के समुद्र जाने को बोला
जंगलों ने परिंदों को अरब के मरुस्थल नहीं भगाया
न ही हवा ने आँधियों को दिशा बदलने के लिए कभी बोला
पर इंसानों ने खून सूँघकर नागरिकता अलगाई।
कुछ ले जाने के लिए आने से सुंदर है
कहीं रहने के लिए आना
सभी कहीं न कहीं से आए होते हैं, माँ के पेट से तो जरूर ही।
उनका धरम निर्गुणियों, सिक्खों और आर्य समाजियों की तरह ही बुतपरस्ती का विरोधी था
पर उन्होंने अब गाय, नदी, पीपल सबको माँ मान लिया है
अब उन्हें कैसे अलगाओगे कि वे मुसलमान हैं ?
उन्हें इतनी बार यहाँ से जाने को कहा जा चुका है
कि वे अब इस दुनिया से ही निकल जाना चाहते हैं
तमाम किलों, सरायों दीवानों के महराबों पर कपड़ों के
उड़ते हरे लाल चीथड़े बता रहे कि वे समर्पण कर चुके हैं
जो पूर्वज उनके थे ही नहीं
उनकी गलतियों की भी माफ़ी भी माँग चुके हैं वे
उनका वजूद उस मस्जिद की तरह थरथरा रहा
जिसे कभी भी बुल्डोजर से गिराया जा सकता
उनका भरोसा उन कब्रगाहों की तरह सहम रहा
जिन्हे कभी भी तोड़ कर उखाड़ा जा सकता है ।
वे चाहते हैं कि उनके कसाई का काम कोई हिंदू कर ले अब
वे अब पीपल काटने जितना भी मुसलमान नहीं होना चाहते
वे कुरान की आयतों की तरह बुदबुदाते जा रहे कि
हमारे दादा-परदादा कई पुश्तों से यहीं के हैं
यहीं उन्होंने शॉल,कालीन पर अपनी बदहाली के चाँद सितारे टांके
यहीं जड़ा उन्होंने कुर्तों पर नग, यहीं सिले अपने हर चीरे चीथड़े
वे सितार शहनाई या तबले में कोई सरगम या ताल की तरह
अपने वजूद को मिटाकर कितने घरानों के सुर बन गये
किस-किस राग को हम निकाल कर पाकिस्तान भेजेंगे ?
किन-किन मिठाइयों से चाशनी निकालेंगे हम ?
कौन-कौन से पहनावों की कढ़ाइयाँ नोचेंगे ?
दंगो के बाद कलेजे से चिपके सहमे बच्चों को
माओं ने यहीं रचे बसे मसीहाओं की कहानियाँ सुनाई
अपने बेटे और पोते की जान गवा देने वाले
बूढ़ों ने भी यहीं पर दो गज़ आखिरी ज़मीन की दुआ माँगी ।
वे नहीं गये , बारहा कहा गया उनसे चले जाने को
पर वे नहीं गये
वे बटवारे के बाद नहीं गये
1968 के बाद भी नहीं गये वे
वे भागलपुर से नहीं गये फैजाबाद से नहीं गये
गोधरा से नहीं गये वे मुजफ्फरनगर से नहीं गये
नहीं गये शाहीनबाग से सीलमपुर से
जबकि उन्हें हर आह पर कहा गया चले जाओ
गांधी मरे तो उनको ही देखा गया
इंदिरा मरीं तो पहला शक जमाने का उन्हीं पर आया
कोई बाहरी हमला हुआ तो अपराधी की तरह देखा गया हामिद को
भारत क्रिकेट मैच भी हारा तो देखा गया
एक मुसलमान का चेहरा
ट्रेन की जनरल बोगी में सिकुड़े बूढ़े की सफेद दाढ़ी खींच कहा गया
पाकिस्तान चले जाओ
क्रिकेट खेलते बच्चे का गाल दबाकर जयश्रीराम बुलवाकर कहा गया
पाकिस्तान चले जाओ
शरीफों द्वारा छेड़ते हुए हाथों को पकड़ने पर तमाम बुर्खे वाली लड़कियों को कहा गया
कहा गया झूठे मुकदमों में अदालतों के चक्कर काटती बूढ़ी माओं को
सभी गालियों को बकने के बाद कहा गया -
पाकिस्तान चले जाओ
बारहा उन्हें ऐसे देखा गया जैसे यह उनका मुल्क़ ही नहीं
सूँघा गया उनकी वाफादारी को बार-बार
सबसे अधिक तलाशी हुई उनके ही घरों की
सरहदों पर गोली खाए हुए परवेज़ की बेवा को भी कह दिया गया
कहा गया देश को कौड़ी के भाव बेचने वाले तमाम नेताओं द्वारा
मोल लगाते हुए , सौदा करते हुए कहा गया
पान की पीक थूकते हुए, शराब के कुल्ले करते हुए
सुअर को हाथ में लिए नाचते हुए कहा गया
पाकिस्तान चले जाओ
उन्हें इस तरह पाकिस्तान की सजा सुनाई गई
मानों वह कोई पड़ोस का मुल्क नहीं जहन्नुम से बद्दतर जगह हो
इस तरह उनके ईमान को
बारहा कुरेदा गया ।
वे पिंजरे से पंछी की तरह उड़ जाएँगे
जाएँगे तो बुझते दीपक से धुएँ की तरह जाएँगे
मरते शरीर से हवा की तरह निकल जाएँगे
बचेगा खाली पिंजरा, दिया, शरीर
मगर वे पाकिस्तान नहीं गये
वे पाकिस्तान नहीं जाएँगे ।
©केतन यादव
Ketan Yadav
( भाई अदनान कफ़िल दरवेश
के लिए )