तू भीत कशी नाहीस?
भ्यायला हवेस,
कारण भीतीशिवाय
पितृसत्ता कशी उभी राहील,
राजसत्ता कशी चालेल,
धर्मसत्ता कशी टिकेल,
लूट आणि शोषणाची व्यवस्था
कशी प्रस्थापित होईल?
पोरी,
तू घाबरत का नाहीस
हुकूमशहांना,
आक्रमकांना?
तू घाबरणार नसशील
तर घाबरणारे बाकीचे लोकही
घाबरणे सोडून देतील.
सत्ताधीशाचे कारकून
‘चिथावणीची ठिणगी
भडकवतेय’
असे सांगून
तुझ्यावर देशद्रोहाचा आरोप लावतील.
देशद्रोह करणारे हेच,
जे संविधानाची शपथ घेऊन
आक्रमक बनत जातात,
सत्तेचे सुख भोगतात.
त्यांचे सारे भोग थांबतील,
आणि मग
त्यांची मुले उपाशी मरतील!
पोरी
ज्या घराच्या
चार भिंतींतून बाहेर पडताना,
काय नेसायचे, काय खायचे,
कसे उठायचे, कसे बसायचे—
या प्रत्येक गोष्टीत
संकोचतात, घाबरतात,
त्यांच्या डोक्यात
तू हे काय भरतेयस?
त्या तर
फक्त आयर्नच्या गोळ्या मागत होत्या,
आणि तू त्यांच्या आत
पोलाद भरतेयस?
प्रत्येक दिशा,
प्रत्येक कोपरा,
प्रत्येक अतिक्रमण
यांच्यावर
तू घाव का घालत निघालीस?
पोरी,
भीतीच्या सावटाखाली जगलेल्या पिढ्यांमध्ये,
देश,संस्कृती आणि
जखडणुकीच्या चौकटीत वाढलेल्या जगात
तू भीतीचा हा चक्रव्यूह
कसा काय भेदलास बये ?
दुर्जनांचा विरोध असो
की स्वजनांचा असहकार,
तरीही तू
एकटी, ठामपणे उभी राहिलीस.
पोरी,
किती प्रिय आहेस तू
तू किती अमूल्य,
किती गरजेची!
कारण
तू सगळ्या पोरीबाळींसाठी
पुढे जाण्याचे मार्ग निर्माण
करीत आहेस,
आणि
आकाशात उंचच उंच झेपावण्यासाठी
त्यांना पंख देत आहेस.
ऐ लड़की, तुम डरती क्यों नहीं हो
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
ऐ लडकी,
तुम डरती क्यों नही हो
डरो,
कि डर के बिना
कैसे खड़ी होगी पितृसत्ता,
कैसे चलेगी राज सत्ता,
कैसे खड़ी रहेगी धर्मसत्ता,
कि कैसे स्थापित होगी लूट की शोषण की व्यवस्था।
ऐ लड़की
तुम डरती क्यों नही हो,
तानाशाहों से,
आक्रांताओं से,
कि नहीं डरोगी
तो डरने वाले बाकी लोग
डरना छोड़ देंगे,
निजाम के कारकून
चिंगारी भड़काना बोल कर
तुम पर देशद्रोह थोप देंगे।
देशद्रोह करने वाले ये,
जो
संविधान की शपथ लेकर
आक्रांता हुए जाते हैं,
सत्ता सुख भोगते हैं,
उनके सब भोग रुक जाएंगे,
इनके तो बच्चे भूखे मर जायेंगे।
लड़कियां
जो घर की चारदीवारी से निकलते
पहनने खाने, उठने बैठने तक में झिझकती हैं, डरती है
उनके भीतर ये क्या भर रही हो?
वे तो सिर्फ आयरन की गोलियां मांग रही थीं,
तुम लोहा भर रही हो?
क्यों हर दिशा, हर कोने, हर अतिक्रमण पर
चोट कर रही हो,
ऐ लड़की,
डरने वाली पीढ़ियों , मुल्क, सभ्यता और जकड़नों में बड़ी हुई
कैसे तोड़ा तुमने डर का चक्रव्यूह,
कि दुर्जनों, स्वजनों के विरोध और असहयोग में भी अकेली अडिग खड़ी हो,
कितनी प्रिय हो ऐ लड़की,
कितनी कीमती हो,
कितनी जरूरी,
कि सब लड़कियों के लिए
बढ़ने के पथ निर्मित कर रही हो,
उड़ने के पंख सृजित कर रही हो।
©वीरेंदर भाटिया
Virender Bhatia