(बडवे-उत्पातांचा बामणी कावा)
पंढरपुरातील उत्पातखोरीचा समाचार
पंढरपूरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आपल्या आर्थिक लूट-कमाईचे हक्काचे साधन मानणार्या मुजोर बडवे आणि उत्पातगिरीला जोरदार झटका तेव्हा बसला जेव्हा पंधरा जानेवारी २०१४ साली सर्वोच्च न्यायालयाचा निकाल महाराष्ट्र सरकारच्या बाजूने लागला, आजवर बडवे-उत्पातांकडून देवाच्या दारात अवहेलना झेलत आलेल्या लाखो वारकरी आणि त्यांच्या सत्तर पिढ्यांच्याबाजूनेही हा निकाल होता!निकालानंतर लगोलग मंदिराच्या गाभार्यातून बडवे-उत्पातांसहित समस्त सेवेकर्यांची रितसर हकालपट्टी करण्यात आली,त्यानंतर काही दिवसातच 'आमच्या पारंपारिक सेवा-पूजेच्या हक्कअधिकारांवर गदा आणल्याची, आल्याची ठो ठो बोंब बडवे आणि कंपनीने ठोकण्यास सुरुवात केली.
अरे..कसला हक्क आणि कसला अधिकार तुमचा?
गोरगरिब,भोळ्याभाबड्या वारकर्यांना देवदर्शनाच्या नावावर लुबाडण्याचा हक्क? विठुरखुमाईच्या नावाने मिळणार्या दक्षिणादेणग्यांनी आपली घरं भरण्याचा अधिकार??
कि संतश्रेष्ठ चोखोबांना आणि अस्पृश्य जनतेला विठुमंदिरात प्रवेशही नाकारण्याचा हक्क? वा रे वा!
जन्म-जाती आणि पढीतपोथीपांडित्याचा गर्वअभिमान मिरवणार्या बडवेउत्पातांनी देवापेक्षाही आपण श्रेष्ठ असल्याचा ताठा अनेकदा मिरवला आहे.
श्रमिक मुक्ती दल आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून मा.भारत पाटणकर,मा.पार्थ पोळके आणि इतर मान्यवरांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल-रखुमाई मंदिरातील 'बडवेउत्पात हटाव' मोहीम यशस्वी झाली.त्यावर न्यायालयाच्या निकालानंतर घटनात्मक शिक्कामोर्तब होऊनही धार्मिकतेच्या नावाखाली सांस्कृतिक दहशत माजवणार्या बडवेउत्पातांनी आपलाच शेडा वर या अभिनिवेशात आपली गुर्मीपूर्ण वर्तणूक सुरुच ठेवली आहे.त्यामुळेच मूळ मंदिरावर टिच्चून स्वतंत्रपणे रुक्मिणीमातेचे नवे मंदिर उभारण्याची वारकरीविचारद्रोही कुकरणी उत्पातांनी केली आहे.
अकरा आॅक्टोबर २०१८ या दिवशी पंढरपूरात उत्पात मंडळींकडून उभारले गेलेल्या मंदिरात रुक्मिणीदेवीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे.येत्या काळात बडव्यांनीही स्वमालकीचे स्वतंत्र विठोबा मंदिर पंढरपूरात उभारल्यास आश्चर्य वाटावयास नको.स्वतःच्या कर्मकांडीय हक्कअधिकाराच्या भंपक गप्पा मारणार्या बडवेउत्पातांना घरातील महिलांना रुक्मिणीमातेच्या पूजाअर्चेची संधी द्यावी असे गेल्या शेकडो वर्षात एकदाही वाटलेले नाही,उघड्या अंगाने आई रखुमाईची पूजाअर्चा,वस्त्रबदल ही नित्यकर्मे अट्टहासाने पुरुष उत्पातच करत आली आहेत.लिंगभेदावरुन कर्म ठरविण्याचा हा भयानक प्रकार ही मंडळी बिनदिक्कतपणे निभावत आली आहेत.याची त्यांना कधीही खंत अथवा लाज,शरम वाटलेली नाही!
काही वर्षांपूर्वी पंढरीतल्या विठुमंदिरातील तिर्थकुंडात एक बडवा अक्षरशः मुतला तरी या पुजारीपुरोहितांना त्याचे काहीच वाटलेले नाही,हा बडवेउत्पातगिरीचा नैतिक अधःपतनाचा आजवरचा इतिहास राहिला आहे.गाभार्यामधली मग्रुरी आणि अरेरावी करण्याची कुवृती तर यांच्या पेशीपेशीत भिनली होती,करमाळ्याचे दिवंगत आमदार दिगंबर बागल यांनादेखील विठुमंदिरातील बडवेगिरीचा किळसवाणा अनुभव आला होता.मग सामान्य वारकर्यांची काय परवड वर्णावी? म्हणूनच मंदिरातून बडवेउत्पात मंडळी न्यायालयीन आदेशाने जेव्हा बेदखल झाले तेव्हा लाखो वारकर्यांनी एकच जल्लोष साजरा केला होता.तो खरोखर धार्मिक पिळवणुकीतून मुक्त झाल्याचा आनंद होता.
आता पून्हा बडवेउत्पातांनी आपला सनातनी बामणी कावा दाखवण्यास सुरुवात केलीय.देवाच्या नावावर नाही नाही ते कर्मकांडी खेळ करण्याचे आणि सामान्य वारकरी जनतेला खेळविण्याचे धंदे ते मंदिरात करत आले आहेत,आता ऐन नवरात्र उत्सवात रुक्मिणीमातेच्या उत्पातप्रणीत मंदिरातही ते सुरु होतील.
विठुरखुमाईची शेकडो मंदिरेच काय प्रतिपंढरपूर जरी बडवेउत्पातांनी उभारले तरी ज्ञानोबातुकोबाचे वारकरी तिकडे फिरकणारदेखील नाहीत,हे लक्षात राहू द्या! काळानुसार तुम्ही नाही बदललात,बुरसटलेपणा नाही सोडलात आणि कायद्याच्या बडग्यानंतरही मुळीच सुधारणार नसाल,धनाची हाव सोडणार नसाल तर चंद्रभागेच्या वाळवंटातच बडवेउत्पातांनों,तुम्हाला वारकरी जनता बदडून काढण्यास कमी करणार नाही.!!
खूपच स्पष्ट , धारदार लेख आहे.
उत्तर द्याहटवा