नवे अभंग(१)

नवे अभंग(१)

नवे अभंग (१)

अन्यायाला ज्यांनी
फोडायची वाचा
त्यांनीच का टाचा,
घासाव्यात?

धर्म आणि अर्थ
बेईमानांची युती
शोषितांचे खाती,
खरडून

स्वाभिमानशून्य
षंढांचा बाजार
बुळा कारभार,
गांडाळांचा

नाहीच कुणीही
इथे गा जिवंत
कणाहीन जात,
लबाडांची

अन्यायाची कधी?
फुटणार कोंडी
शोषकांच्या झुंडी,
गाडू आता

शब्द हेचि ढाल
शब्दचि तलवार
शब्दाचे हत्यार,
परजुनी
               
                         
               
               
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने