सत्यशोधकी कविता(१)
साईबाबा
करी विटंबना ज्याच्या
शुध्द फकिरी वृत्तीची
लाज वाटते आम्हाला
अशा बेगड्या भक्तीची
साईबाबांची श्रीमंती
दलालांचा बडेजाव
भाविकांच्या भावनांचा
सोन्याचांदीत मोलभाव
याचकाचा वेषधारी
ज्याचे अनवाणी पाय
उदअबिराचा लोभी
दीनदुबळ्यांची माय
चाले समाधी शताब्दी
केला फकिराचा देव
हातजोड्या वृृृत्तीला गा
मिळे मुबलक वाव
पाषाणाचा स्वामी
त्याला सोन्याचे आसन
श्रध्दाळूंच्या ऐहिकतेला
कशी घालावी वेसण??
साईबाबा
करी विटंबना ज्याच्या
शुध्द फकिरी वृत्तीची
लाज वाटते आम्हाला
अशा बेगड्या भक्तीची
साईबाबांची श्रीमंती
दलालांचा बडेजाव
भाविकांच्या भावनांचा
सोन्याचांदीत मोलभाव
याचकाचा वेषधारी
ज्याचे अनवाणी पाय
उदअबिराचा लोभी
दीनदुबळ्यांची माय
चाले समाधी शताब्दी
केला फकिराचा देव
हातजोड्या वृृृत्तीला गा
मिळे मुबलक वाव
पाषाणाचा स्वामी
त्याला सोन्याचे आसन
श्रध्दाळूंच्या ऐहिकतेला
कशी घालावी वेसण??