सत्यशोधकी कविता २ (वैषम्य)

सत्यशोधकी कविता २ (वैषम्य)

वैषम्य

देवळांनी निर्मियले
किती कचर्‍याचे ढीग
भक्तांच्या अस्वच्छतेचा
आला देवाला उबग

कळकट गाभार्‍यात
दह्यादुधाची नासाडी
भक्तीभाव भाविकांचा
भरे पुजारी तुंबडी

दारापुढे देवा तुझ्या
सदा याचकांचा तांडा
रांगेमध्ये धक्केखोर
सांडे श्रध्देचा करंडा

भक्त कमी दर्शनास
खिसेकापूंचा सुकाळ
हारकापराचा मारा
खपे टनाने नारळ

वाटे वैषम्य देवाला
कर्मकांड पसार्‍याचे
देवळात त्याच्या फक्त
भले झाले पुजार्‍यांचे!
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने