कुंकवाचं मोल
घरधनी गेला तिचा
घोर लावूनी जीवास
गळ्यामध्ये त्याच्या फास
तिचे आयुष्य पणास
वावर उदास वाटे
तिला घर कारावास
आता उतरत नाही
नाही नरड्यात घास
फुटे दिल्लीला पाझर
दिला धाडूनिया चेक
भरपाई देण्यासाठी
नाही बॅंकेत शिल्लक
लालफितीचा कानून
वागणूक कसाबाची
वाटा कष्टाचा मागते
विधवा ती कुणब्याची
दया नाही माया नाही
सरकारी कातडीला
आबाळ गा तान्हुल्यांची
पिळ आईच्या आतडीला
काय कागदी पैशात
तिच्या कुंकवाचं मोल?
वाजे पेपरात नित्य
निधीवाटपाचा ढोल
मानीमन गुमान, लाख
अपमाना गिळते
वाढणार्या वत्सावर
दृष्टी गाईची खिळते
पंख फुटण्याआधीच
तुटे पितृसहवास
चिमण्या जीवासाठी
माय सोसते वनवास
दुःखभार पेलण्याचे
बळ भुईला लाभावे
माऊलीच्या मायेपुढे
आभाळही गहिवरावे!
घरधनी गेला तिचा
घोर लावूनी जीवास
गळ्यामध्ये त्याच्या फास
तिचे आयुष्य पणास
वावर उदास वाटे
तिला घर कारावास
आता उतरत नाही
नाही नरड्यात घास
फुटे दिल्लीला पाझर
दिला धाडूनिया चेक
भरपाई देण्यासाठी
नाही बॅंकेत शिल्लक
लालफितीचा कानून
वागणूक कसाबाची
वाटा कष्टाचा मागते
विधवा ती कुणब्याची
दया नाही माया नाही
सरकारी कातडीला
आबाळ गा तान्हुल्यांची
पिळ आईच्या आतडीला
काय कागदी पैशात
तिच्या कुंकवाचं मोल?
वाजे पेपरात नित्य
निधीवाटपाचा ढोल
मानीमन गुमान, लाख
अपमाना गिळते
वाढणार्या वत्सावर
दृष्टी गाईची खिळते
पंख फुटण्याआधीच
तुटे पितृसहवास
चिमण्या जीवासाठी
माय सोसते वनवास
दुःखभार पेलण्याचे
बळ भुईला लाभावे
माऊलीच्या मायेपुढे
आभाळही गहिवरावे!