ठाकरी नव्हे निव्वळ विखारी!
स्मृतिशेष शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या हयातीत अनेकवेळा राजकीय विरोधकांवर शाब्दिक हल्ले चढवले होते.पण त्यात नेहमीच अभिजात मिस्कीलपणा असायचा,व्यंगचित्रातूनही त्यांनी हेच तत्व जपले होते,चिमटा काढायचा पण रक्तबंबाळ होईपर्यंत ओरखडा नसायचा! त्यामुळे त्यांचे राजकीय विरोधकांशीही शेवटपर्यंत मधुर संबंध टिकून राहिले.मात्र त्यांच्याच राजकीय पाऊलवाटेवरुन चालत असल्याचे सांगणारे त्यांचे राजकीय वारसदार,शिवसेना पक्षाध्यक्ष उध्दव ठाकरे हे मात्र पक्षाच्या मुखपत्रातून विरोधकांवर टिका करण्याच्या निमित्ताने मराठी पत्रकारितेलाच लाज वाटावी अशी भाषा वापरत ठाकरीशैलीचीच पूरती वासलात लावत आहेत.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर जात गलिच्छ आणि बीभत्स भाषा वापरुन शिवसेनेने मुखपत्राच्या संसदीय परंपरेच्या उद्देशाचाच मुखभंग केला आहे.अजितदादा हे जाहीर भाषणात नेहमीच ग्रामिण शैलीत जनतेशी संवाद साधत असतात.त्याचा त्यांना मागे जबर फटकादेखील बसला आहे.आताही उध्दव यांना उद्देशून त्यांनी विचारलेला परखड सवालच या वादाचे मूळ कारण ठरले आहे.'अयोध्येत जाऊन आता काय दिवे लावणार? ज्यांना साडेचारवर्षात बापाचे स्मारकही उभे करता आले नाही!' पवार यांचे हेच बोल उद्धव यांच्या जिव्हारी लागले असावेत म्हणूनच सामना मधून ते शब्दशः घसरले आहेत.यापूर्वीही अजीत पवार यांनी शिवसेनेच्या दुटप्पीपणावर हल्ला चढवताना शिवसेनेला गांडुळाची उपमा दिली होती! त्यावरुनही आरोपप्रत्यारोप झडले होते.
दोन राजकीय विरोधकांमध्ये अत्यंत जिव्हाळ्याचे जरी नसले तरी किमान सौजन्याचे संबंध असणे अपेक्षीत असते मात्र सत्ताधारी शिवसेनेकडून सगळीच नैतिकता,नीतीमूल्ये गुंडाळून ठेवली जात आहेत.
मूळात महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या जगण्याचे प्रश्न उग्र बनलेले असताना,सत्तेत राहूनही जनहिताचं ठोस काहीही करु न शकलेल्या शिवसेनेला राममंदिराच्या मुद्याआडून हिंदुत्वाला उजाळा देण्याची अवदसा आठवतेच कशी?
सत्तेतील प्रमुख भागीदार भाजपला नामोहरम करण्याची एकही संधी न सोडणार्या शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर जाऊन उग्र हिंदुत्वाचा झेंडा फडकावण्याची कोण घाई झाली आहे!
गोवा,गुजरात या राज्यात डाळ शिजली नाही म्हणून आता उत्तरप्रदेशात जाऊन राममंदिराचा प्रश्न उपस्थित करत योगी आणि मोदी यांना खिजवण्याचा उद्योग भगव्या 'शेणापतीं'कडून सुरु आहे! याचा महाराष्ट्रातील जनतेला उपयोग काय म्हणाल तर काहीही नाही! पण तरिही धार्मिक अस्मितेचे मुद्दे ऐन निवडणुकीपुढे उकरुन काढत जनतेचे लक्ष तिसरीकडेच वळवायचे डावपेच तमाम सेनानेत्यांकडून सुरु आहेत.
मराठी पत्रकारितेतील संपादकीय लेखनाला वैभवशाली परंपरा आहे.आगरकर-अत्रे यांच्यापासून ते गोविंद तळवलकर-नारायण आठवले यांच्यापर्यंतच्या संपादकांची भाषा परखड,रोखठोक असायची. त्या लेखनाला प्रामुख्याने जनहिताच्या तळमळीचा सुगंध असायचा पण सेनामुखपत्रातील या ठाकरीपणा संपलेल्या भाषेत फक्त आणि फक्त विखारच ठासून भरलेला जाणवतोय.जो राजकीय नेत्यांच्या सार्वजनिक सुवर्तुणुकीची धादांत पायमल्लीच ठरावी.इथे प्रश्न एकट्या अजीत पवारांच्या अवमानाचा नाही तर एकूणच पक्षीय राजकारणातील वाढत्या अधःपतनाचा आहे.
पक्षसंघटनेच्या टोळ्या पाळणार्या,सांभाळणार्यांना केवळ सत्ताच सर्वस्व वाटत असण्याच्या या काळात भाषिक नैतिकतेशी कुणाचेही देणेघेणे उरलेले नसावे!