देशाला लाखो पप्पूंची गरज!
-लालूप्रसाद यादव
४ नोव्हेंबर २०१८
आपणास ऐकून नवल वाटेल की,देशाला लाखो पप्पूंची गरज का आहे?
आणि यावर लेख लिहीण्याचीही आवश्यकता का आहे?
पप्पू हा पप्पूच असतो,तो काय कामाचा?
पण माझ्या आकलनानुसार
आता सर्वांनीच पप्पू झाले पाहिजे आणि देशाची सद्यस्थिती पाहता खरोखरच लाखो पप्पूंची आज देशाला गरज आहे. पप्पूंच्या आवश्यकतेच्या मुद्यावर जाण्यापूर्वी आपणांस आधी समजून घ्यावे लागेल की,
समाज पप्पू कोणाला म्हणतो,मानतो?
तर भारतीय समाजात पप्पू त्याला म्हटले जाते जो सरळसाध्या स्वभावाचा असतो,ज्याच्या मनात कसलीच खोट नसते,कुणाविषयी भेदभावही नसतो,जो खरे बोलतो आणि तो प्रामाणिक असतो.परंतू दुर्दैव हे की,समाज अशा लोकांनाच पप्पू मानतो व संबोधतोही!
कारण आज दुनिया आणि समाज स्वार्थी,अप्पलपोटी,घातक, नकली तसेच लबाड बनला आहे.ज्या व्यक्तीमध्ये हे गुण ठासून भरलेले असतील,आढळतील समाज त्यालाच पूजतो.
विश्वास बसत नसेल तर या अशाच दोन व्यक्तींची भेट घडवतो!
या लेखाचे शीर्षक 'देशाला लाखो पप्पूंची गरज आहे! असा असल्यामुळे आपणास सर्वात आधी देशातील सर्वात मोठ्या तसेच एकमेव पप्पूपासून सुरुवात करुया.
होय मी श्री राहुल गांधी यांच्याबद्दलच बोलतोय.राहुल गांधी हे एक अत्यंत चांगले व्यक्ती आणि नेते आहेत.त्यांच्या मनात कणभरही खोटारडेपणा नाही,जे काही आहे ते उघड्या पुस्तकाप्रमाणे, ज्याला कुणीही वाचू शकतो,वाचू शकेल.नकली भूमिका आणि बनावट गोष्टींवर ते विश्वास ठेवत नाहीत.ते एक प्रामाणिक राजकीय नेते आहेत आणि स्वच्छ राजकारण करताहेत.आजच्या राजकारणातील बहूतेक पुढार्यांची भाषा जिथे अत्यंत गलिच्छ झालीय,तिथे राहुल गांधी यांच्या भाषेची नैतिक मर्यादा कायम आहे.साठ वर्षांपर्यंत ज्यांच्या पूर्वसुरींनी देशावर राज्य केले त्यानंतरही राहुल गांधी यांच्या स्वभावात अहंकाराचा लवलेश नाही.
राहुल यांनी ठरवले असते तर शौर्य डोभाल,जय शहा या इतर राजकीय नेत्यांच्या मुलांप्रमाणे आपला व्यवसाय चालवू शकले असते,विदेशात जाऊ आणि ऐशोआरामाची जीवनशैली जगू शकले असते.परंतू राहुल यांनी राजकीय क्षेत्र निवडले.युपीए १ आणि युपीए २ च्या कार्यकाळात असे अनेक प्रसंग आले जेव्हा राहुल दलितांच्या घरी गेले,त्यांच्याबरोबर काम केले,श्रम दान केले.हा जर दिखाऊपणाच असेल तर तर असा दिखाऊपणा किती राजकीय नेते करत आहेत? अमित शहाचे पुत्र असे करतील? डोभाल यांचे चिरंजीव शौर्य असे करतील? अजिबात नाही पण राहुल यांनी ते केंद्रात युपीए चे सरकार सत्तेवर असतानाही केले आणि आताही करतायत ज्यावेळी भाजपचे सरकार आहे. आपणास आठवत असेल शेतकर्यांच्या जमीन अधिग्रहणासाठी जेव्हा मोदी सरकारने काळा कायदा आणला होता तेव्हा दुसरेतिसरे कुणी नाही तर ते राहुल गांधीच होते ज्यांनी भट्टा परसोल मध्ये जाऊन आंदोलन केले होते ज्यामुळे अखेर मोदी सरकारला झुकावे लागले होते.
जेएनयु चा वाद असो,किंवा एसएससी भ्रष्टाचारावरचे विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आंदोलन असो,अशा सर्व ठिकाणी राहुल गांधी नुसते गेलेच नाहीत तर त्या आंदोलनाचा भागही बनले आणि आता मल्या,नीरव मोदी,मेहूल चौकसी यांचा विषय असो वा बॅंकांच्या NPA चा मुद्दा असो ते राहुलच उचलताना दिसताहेत.CAG,CVC,CBI,IT,ED निवडणूक आयोग तसेच इतर घटनात्मक संस्थांच्या स्वायत्ततेची बाब असो,त्यासाठीही राहुल गांधी हेच आपला आवाज बुलंद करत येत आहेत.सध्या राफेल व्यवहारातील घोटाळ्यावर तेच एकमेव नेते आहेत की,जे सातत्याने आक्रमक पध्दतीने या विषयावरुन मोदी सरकारला अडचणीत आणण्यातच नव्हे तर याचा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करवून घेण्यातही यशस्वी ठरतील.
याव्यतिरिक्त राहुल गांधींनी आपल्या कुटुंबातील दोन व्यक्तींना गमावले.एक आजी इंदिरा गांधी आणि दुसरे वडिल राजीव गांधी.पण त्यांनी याचा कधीही भावनिक लाभ घेतला नाही.देशाच्या स्वातंत्र्यापासून ते देशाच्या औद्योगिक उभारणी करण्यापर्यंत गांधी परिवाराने दिलेल्या योगदानाला विसरता येणे शक्य नाही.
आता दुसर्या व्यक्तीकडे येऊ.होय मी नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच बोलतोय.नरेंद्र मोदी हे एक असे व्यक्ती आहेत की,ज्यांची प्रत्येक बाब नकली आणि बनावट आहे.आजपर्यंत त्यांच्या पदवीचा पत्ता नाही. बनावट बोलणे,सतत खोटे सांगणे,दिखाऊपणा तसेच प्रत्येक गोष्टीचे मार्केटिंग करणे.आता हेच पाहा ना,तेरा वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री राहिले,मुख्यमंत्रीपासून पंतप्रधान झाले पण अजूनही स्वतःला चहावाला म्हणूनच संबोधतात,कुठे चहा विकला याचा कुणी साक्षीदार नाही?कुणी यांचा चहा प्याला? हे कुणालाही ठाऊक नाही.निवडणूक जाहीरनाम्यात स्वतःला कितीवेळा तरी अविवाहीत म्हणून सांगितले जे प्रत्यक्षात विवाहीत होते.गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोध्रा दंगल घडविली,ज्यात हजारो मुस्लिम मारले गेले,शेकडो मुस्लिम महिलांवर बलात्कार केले गेले,एवढेच काय लहान मुलंसुध्दा मारली गेली.
२०१४ ला शेकडो खोटे वायदे करुन फसवून पंतप्रधान झाले आणि पंतप्रधान झाल्यानंतर देशाची काय अवस्था काय करुन ठेवली आहे हे आपल्यापासून लपलेले नाही.पंतप्रधानपदी आल्यानंतरही ते सातत्याने खोटं बोलताहेत,इतकेच काय,लाल किल्याच्या बुरुजावरुनही प्रत्येकवेळेस खोटं बोलत आहेत,चूकीचा डाटा देशापुढे मांडत आहेत.
यांच्या खोट्या आणि बनावटी बाता 'मन की बात' मधूनही समजल्या आहेत,ज्यानंतर पुण्यप्रसून वाजपेयी यांची ABP मधून उचलबांगडी करण्यात आली. मोदी हे फक्त खोटेच पसरवत नाहीएत तर समाज आणि देशात द्वेष व विषही पसरवतात.देशाला हिंदू-मुस्लिम,दलित-मागासवर्गिय आणि उच्चवर्णिय यांच्या झगड्यात अडकवतात.ते इथेच थांबत नाहीत,इतिहासाची मोडतोड,विकृतीकरण करत महापुरुषांबद्दलची चूकीची माहिती सादर करत आहेत.आता अलिकडेच सरदार पटेल यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावेळेस बोलले की,नेहरु आणि काॅंग्रेसने पटेल यांना न्याय नाही दिला,त्यांची उपेक्षा केली,प्रत्यक्षात पटेल हे नेहरुंचे फक्त उत्तम मित्रच नव्हते तर मंत्रीमंडळातले गृहमंत्री तसेच देशाचे पहिले उपपंतप्रधान होते.नेहरुंनी सरदार पटेल यांना प्रांतीय संविधान सभेचे अध्यक्षदेखील केले होते,सर्व देशी संस्थाने भारतात विलीन करणे हे ज्यांचे काम होते.मात्र मोदी नेहमी खोटेच शिजवतात. भारताच्या राजकीय इतिहासात असे क्वचितच एखादे पंतप्रधान असतील ज्यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धूळीस मिळवली असेल.
आता आपणच ठरवा की,भारतीय राजकारणात प्रामाणिक आणि खरा नेता हवा की मोदींसारखा देशाला आणि समाजाला अनेक तुकड्यात वाटणारा खोटारडा आणि धूर्त?
जर इमानदार असणे,खरे बोलणे,गोरगरिबांसाठी आवाज उठवणे आणि लढणे,भ्रष्टाचार उघडकीस आणणे,परस्पर सौहार्द तसेच बंधूभाव वाढवणे जर पप्पू म्हटले जात असेल तर मी म्हणतो,की देशाला अशा लाखो पप्पूंची गरज आहे.आणि शांत डोक्याने आपणही विचार करावा,की राहुल गांधींसारख्या नेत्यांचीच आपल्या देशाला आवश्यकता आहे,मोदींसारख्या खोटारड्या आणि नकली नव्हे.
🚩 जय हिंद 🚩
मूळ हिंदी लेख
लालूप्रसाद यादव
मराठी अनुवाद
भरत यादव