शिवराय वंदना (कविता)

शिवराय वंदना (कविता)


शिवराय वंदना

तुझ्या कर्तृृृृत्वस्मरणे
उर्मी स्वातंत्र्याची भेटे

तुझ्या नेतृृृृृृृत्वाच्या गुणे
नूर राष्ट्राचा पालटे

तुझ्या शौर्याच्या प्रेरणे
मने मर्‍हाटी चेतती

तुझ्या किर्तीच्या झडती
हिंदभूमीत नौबती

तुझ्या नावाचे गारुड
कोटी कोटी मनावर

तुझ्या कार्यप्रकाशाने
पिढ्या पिढ्या भानावर !
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने