मराठी बाणा (अभंग/कविता)

मराठी बाणा (अभंग/कविता)

मराठी बाणा

परप्रांतियांनी
केले आक्रमण
मुंबई आंदण,
दिले त्यांना

मराठी माणसे
कनवाळू फार
राहायचे घर,
केले खाली

आल्यागेलेल्यांना
करतो जवळ
दोष हा सकळ,
आपलाच

टपली गिधाडे
घास गिळण्यास
मुंबईचा श्वास,
कोंडलेला

वाढला वाढला
आता अत्याचार
बरसे कहर,
उत्तरेचा

एकाच देशाची
जरी हो लेकरे
आम्ही का लक्तरे,
पांघरावी?

षंढ पुढार्‍यांनी
मांडला बाजार
जाहले लाचार,
मतांसाठी

पडली आपली
अक्कल गहाण
पायची वहाण,
व्हा रे आता

मराठा कुस्करा
करा बरबाद
देती आशिर्वाद,
दिल्लीश्वर
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने