देवकीचा तान्हा
यशोदेचा कान्हा
द्वारकेचा राणा,
यदुनाथ
वैदिकांचा वैरी
गोवर्धनसखा
आणिपाठीराखा
गोपाळांचा
गोकुळात तुझ्या
उन्मादा उधाण
लाभे सिंहासन,
कर्मठांना
धनदांडग्यांच्या
चैनीचा हा काळ
पाठीवर वळ,
गरिबांच्या
गौळणींच्यासदा
काळजास घोर
सुखाचा बाजार,
उठलेला
मथुरेत पून्हा
कंस मातलेला
दंश यमुनेला,
कालियाचा
यावे यावे आता
कराया निःपात
पुतणेचा अंत,
घडो पून्हा