गुढी पाडवाः हजारो वर्षांचा
निकोप व निरामय वारसा
-------------------------------
गुढी पाडव्याचा सण साजरा करावा की नाही? तसेच यादिवशी घरावर गुढी उभारावी की नको?
यावर महाराष्ट्रात अलिकडच्या काळात वाद झडत असताना तसेच
तावातावाने मतं मांडली जात असताना
ज्येष्ठ विचारवंत आणि प्राच्यविद्यापंडित डाॅ.आ.ह.साळुंखे यांनी गुढी पाडव्यादिवशी गुढी उभी करण्याची प्रथा शंकर आणि पार्वती यांच्या चरित्राशी जवळून निगडीत असल्याची निःसंदिग्ध ग्वाही 'गुढी आणि शंकरपार्वती' या आपल्या ग्रंथामधील मांडणीतून दिली आहे.
आपण कुठल्याही प्रकारच्या चाकोरीबध्द कर्मकांडाचे समर्थक नसल्याचे सुरुवातीलाच स्पष्ट करत त्यांनी कर्मकांडामागचा इतिहास तपासण्याची गरज प्रतिपादीत केली आहे.त्यानुसार गुढी उभारण्याची ही प्रथा अलीकडच्या तीन-सव्वातीनशे वर्षांतील आहे की,तिला त्यापूर्वीची काही परंपरा आहे,याचा चिकित्सकवृत्तीने शोध घेण्याचा हा प्रयत्न असल्याचे ते सांगतात.
भारतीय परंपरेतील सण-उत्सवांकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता त्यांच्याकडे, जो आमचा स्वतःचा उज्ज्वल वारसा आहे,तो कोणी तरी आमच्याकडून हिसकावून आणि हिरावून घेतलेला असला,
तर आम्ही तो का नाकारावा?त्याच्याविषयी तुच्छता का बाळगावी?त्याचा धिक्कार का करावा? आमचा चांगला वारसा आमचा आम्ही हस्तगत केला पाहिजे.त्याच्यावर इतरांनी चढविलेली त्यांच्या अहंकाराची पुटे दूर केली पाहिजेत आणि आमचा वारसा विशुध्द स्वरुपात परत मिळवला पाहिजे,जपलाही पाहिजे,अशा भूमिकेतून पाहाण्याचा सल्ला ते देतात.
वैदिक चातुर्वर्ण्य व्यवस्थेने बहुसंख्य जनतेला धार्मिक आणि मानसिक गुलामगिरीच्या सापळ्यात अडकवून जखडून टाकण्यासाठी
त्यांना तेजोहीन करण्यासाठी आमच्या वेदपूर्वकालीन देदिप्यमान प्राचीन सिंधूकालिन इतिहासाचे,बळीवंशीय परंपरेचे जाणीवपूर्वक विकृतीकरण केले.मूळच्या कृषीपरंपरेवर वेदवादी ऋषीपरंपरेची अनावश्यक पुटे चढवली,त्यामुळे आपण आपल्याच उज्ज्वल वारशापासून तुटलो,दुरावलो.
त्या जाज्वल्य परंपरांशी पून्हा जोडून घेण्यासाठी आपण साजरे करत असलेल्या सणउत्सवांचा अर्थ नव्याने उलगडला जाणे व तो उगवत्या पिढीपुढे सातत्याने ठेवणे महत्वाचे ठरणार आहे.
शिव हे दैवत यज्ञविरोधी म्हणजेच वैदिकविरोधी मानले जाते.
प्राचीन भारतातील सिंधूजनांवर वैदिकतेचा म्हणजेच ब्राह्मण्याचा पगडा निर्माण होण्यापूर्वीची समतावादी,मातृसत्ताक परंपरेचे स्मरणसुध्दा गुढी उभी करण्याच्या प्रथापरंपरेतून आपणांस होते.
सांस्कृतिक इतिहासाचे विद्रुपीकरण करुन त्यावर वैदिक आणि पौराणिक बेगड डकवण्याचे व त्यातून मानवी पिळवणुकीचे सनातन तंत्र बळकट करण्याचे मानवताद्रोही कटकारस्थाने प्रतिक्रांतीतून यशस्वी होत आले आहेत.त्यातून येथील बहूजनांना पुनःपून्हा सांस्कृतिकदृष्ट्या उपरे ठरवले गेले.शिव आणि त्याचे वाहन नंदी हे प्राचीन काळापासून भारतीय कृषीसंस्कृतीशी निगडीतच मानण्यात आले आहेत.
भारतातील मुख्य संघर्ष हा वैदिक विरुध्द अवैदिक असाच राहिला आहे.त्याच्या पाऊलखूणा या गुढी पाडवा व इतर परंपरातूनही दिसून येतात.गुढी पाडवा आणि शिवशंकर
यांचे परस्पर नाते आजच्या काळातही श्रीशैलम् आणि इतर प्रसिध्द तिर्थस्थळे व मंदिरातील पूजापरंपरेतून पाहायला मिळते.
शंकर,शिव,महादेव,रुद्र अशा विविध नावाने भारतीय जनमानसामध्ये अपार श्रध्देचे स्थान पटकावलेल्या
या देवाधिदेवाची नेहमीची उग्र नव्हे तर प्रसन्न मुद्रेतील प्रतिमा गुढी पाडव्यादिवशी पूजली जाते.
देवदानवांच्या संघर्षात सदैव असुर-दानवांच्या बाजूने उभे राहात आलेल्या शंकर या दैवताला
काळाच्या ओघात वैदिकांनी
वेदवादीच बनवून टाकले,खरेतर
भोळा सांब म्हणजे अन्यायग्रस्त,उपेक्षित,शोषितांचा कैवारी मानला गेलेला देव.
मूळात इथल्या शोषित जनतेचा स्वतंत्र असा सांस्कृतिक इतिहासच नाही.शोषकांनी आपल्या सोयीसाठी आणि गौरवीकरणासाठी लिहून ठेवलेल्या साहित्यावरुनच शोषितांचा इतिहास धुंडाळावा लागतो.
प्राचीन परंपरांचा चिकीत्सक दृष्टीने अभ्यास व निरीक्षण केल्यास त्यातून अनेकदा प्रेरणास्रोत सापडू शकतात.
म्हणूनच प्राचीन साहित्यात विखुरलेल्या कथा,काव्य आणि मिथकांचे संदर्भ वारंवार पडताळून पाहाणे गरजेचे ठरते.
त्याआधारेच सांस्कृतिक इतिहासाची सत्य व पुनर्मांडणी शक्य होणार असते.गुढी पाडवा या सणाबाबत
त्यासंदर्भातूनच विचार होणे महत्वाचे
ठरेल.
गुढीपाडवा म्हणजे नव्या वर्षाची,संवत्सराची सुरुवात मानली जाते.
वसंतऋतूच्या आगमनाचाही हा काळ असतो.
महाभारतातील कथेनुसार उपरिचर वसूच्या काळापासून वर्षानुवर्षे श्रेष्ठ राजे काठी रोवण्याची ही परंपरा चालवत आले आहेत.
महाराष्ट्रातही चैत्र शुध्द प्रतिपदेला म्हणजेच नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी श्रध्दापूर्वक गुढी उभारण्याची प्रथा रुढ आहे.
अाधुनिक काळातील गुढी आणि प्राचीन वाङमयातील गुढीची वर्णने पाहता त्यात बरीच साम्यस्थळे आढळतात.प्राचीन काळी वसूने बांबूच्याच काठीची गुढी उभारुन महोत्सव साजरा केल्याचे उल्लेख आहेत.आज गुढीपाडव्यादिवशी घरोघरी गुढी उभारण्याच्या कृती वा विधीतून आपण त्याच प्राचीन परंपरेशी जोडून घेण्याचा प्रयत्न करत असतो.
सत्तासंपत्ती व इतर साधने हाती आल्यामुळे या देशाचा बहुजनवादी इतिहासच बदलण्याचा चंग प्रतिगामी शक्तींनी बांधला आहे हे अलिकडच्या काळात सातत्याने अनुभवण्यास मिळत आहे.इतिहासाचे वैदिकीकरण म्हणजेच विकृतीकरण करण्याच्या धडपडीत असलेले कट्टरतावादी वेदकाळाला सिंधुसंस्कृतीच्याही पूर्वी असल्याचे खोट्या पुराव्यानिशी सिध्द करण्याच्या उपदव्यापात गुंतलेली आहे.
या पार्श्वभूमीवर शंकर आणि पार्वती यांना प्राचीन काळापासून भारतीय परंपरेने आद्य मातापिताच मानले आहे. गुढीपाडवा हा सणही या आदर्श आणि आद्य दांपत्याच्या गौरवार्थच साजरा होत आला आहे.
महाकवी कालिदासाने रघुवंश या महाकाव्याच्या सुरुवातीलाच जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरो अशा शब्दात जगाचे आईवडिल असलेल्या पार्वतीपरमेश्वरांना वंदन केले आहे.
सांस्कृतिकदृष्ट्या ही बाब महत्वाची आहे. जगन्माता पार्वती आणि सृष्टिकर्ता शंकर यांच्या विवाहनिश्चितीचा आनंदच गुढ्यातोरणे उभारुन साजरा होत आला आहे.
प्राच्यविद्यासंशोधक काॅम्रेड शरद पाटील यांनीही महाभारतातील वर्णनाचा संदर्भ देत गुढीपाडवा म्हणजे प्राचीन इंद्रोत्सवाचाच अवशेष,भाग असल्याचे प्रतिपादन करताना चैत्री शुध्द प्रतिपदेला एका काठीवर नवे वस्त्र लपेटून त्यावर नवपल्लवीत निंबाची फांदी बांधून त्यावर तांब्या ठेवतात,असा स्पष्ट उल्लेख केला आहे.
गुढी हा शब्द अस्सल देशी आहे.कारण या शब्दाचे मूळ संस्कृत भाषेत आढळत नाही.गुढी या शब्दाचा वैदिक परंपरेशी संबंध नाही.
हा शब्द द्रविडी भाषेचीच देण आहे.म्हणूनच गुढी उभारण्याच्या प्रथा वा परंपरेला अस्सल मूलनिवासी सुगंध आहे,असे म्हटले तर वावगे ठरु नये.गुढी किंवा ध्वजा म्हणजे पार्वतीमातेचेच प्रतिक मानता येईल.गुढीला रेशमी वस्त्र आणि कडुनिंबाची पुष्पयुक्त फांदी,साखरेच्या पुतळ्यांचा हार आदींनी सजवणे म्हणजे महादेवाशी विवाहासाठी साजर्या उमेला सालंकृत करण्यासारखेच होय.
लोकवाङयातही गुढीपाडव्याचे वर्णन आढळते.कानडी वचन साहित्य आणि मराठी संत साहित्यात गुढीचा उल्लेख आहे. ओडेयरु बंदडे गुडी तोरणव कट्टी म्हणजेच शरणांचे आगमन होता गुढ्या उभारुन तोरणे बांधा असे महात्मा बसवण्णांच्या कानडी वचनात नमूद आहे.
मराठी भाषेत गुढी या शब्दाचा उल्लेख तेराव्या चौदाव्या शतकातील साहित्यात आढळून आला आहे.
चक्रधर स्वामींच्या लीळाचरित्रातही ...गुढिया उभिलियाःचलद्रुपा पताका...असे वर्णन आहे.
संत नामदेव,संत चोखामेळा,संत ज्ञानेश्वर यांच्या अभंग -ओव्यातही गुढी या संकल्पनेचा वावर दिसून येतो.
संत तुकोबांनीही अभंगगाथेत
गुढी शब्दाचा अनेकवेळा उल्लेख केला आहे.
आजच्या काळात गुढीपाडवा या सणाकडे पाहताना प्राचीन सिंधुकालीन भारतीय परंपरा ते आधुनिक महाराष्ट्रातील गुढी उभारण्याची प्रथा इथवरचा मागील हजारो वर्षांपासून अखंडपणे वाहात आलेला निकोप आणि निरामय संस्कृती प्रवाह लक्षात घ्यायला हवा.