खुनी नथुरामचा पुळका का?
प्रसिध्द अभिनेते आणि मक्कलनिधी मय्यम पक्षाचे संस्थापक कमल हासन
यांच्या 'राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदु दहशतवादी असल्याच्या ' वक्तव्यावरुन देशभरात गदारोळ सुरु आहे. त्यानिमित्ताने देशातील छुपे आणि उघड गोडसेसमर्थक पुढे येत आहेत.
मराठी रंगभूमीवर खूनी नथुरामाची भूमिका करुन सदाशिवपेठी वर्तुळात फ्येमस असलेल्या पुचाट आणि सुमार नट शरद पोंक्षेने आपली अक्कल पाजळत गांधीजींचा खून करणारा नथुराम हा अतिरेकी वा दहशतवादी ठरत नाही असे म्हटले आहे.दहशतवादाला धर्म नसतो असे सांगत मुसलमानांना लक्ष्य करतानाच हिंदुंच्या सहिष्णुतेची महत्ता सांगताना मोठ्या तत्ववेत्त्याचा आव आणला आहे.तो आणताना नीच खूनी नथुराम्याची पाठराखण करण्याची पोंक्ष्यांची केविलवाणी धडपड लपून राहात नाही! अहिंसेचे पुजारी असलेल्या गांधीजींना जीवानिशी संपवणारा खुनशी नथुराम पोंक्ष्यांचा जिवलग आप्तच असावा जणू!
पण मुळात या देशातील बहूसंख्यांक हिंदु जनतेच्या सहिष्णुतेबद्दल आपले थोबाड उघडण्याचा या नथुराम समर्थकांना अधिकारच कुणी दिला? भारतातील जनता प्रामुख्याने हिंदू असली तरी ती हिंदुत्ववादी आहेच असे मुळीच म्हणता येत नाही.हिंदू आणि हिंदुत्व या स्वतंत्र दोन गोष्टी वा संकल्पना आहेत.देशातील मूठभर कट्टरवादी टाळक्यांनी हिंदुत्वाचा भ्रम पसरवण्यात यश मिळवलेय.त्यामागे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व्यापक कटकारस्थान आहे. मागील लोकसभा निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरणाचा नागपुरी प्रयोग कांग्रेसच्या भ्रष्ट राजवटीला कंटाळलेल्या मतदारांमुळे यशस्वी झाला होता.
महात्मा गांधींनी देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात अभूतपूर्व योगदान दिले,ते दुर्लक्षिण्याचा करंटेपणाही हेच कट्टरतावादी आजवर करत आले आहेत.गांधीजींसारख्या लोकोत्तर नेत्याचा खून करण्यात जरी नथुराम आणि त्याच्या कपटी गॅंगला यश मिळाले असले तरी भारतातला गांधीविचार ते संपवू शकलेले नाहीत. गांधीविचारधारा अमर आहे.हीच या नथुरामींची खरी पोटदुखी आहे.म्हणूनच ते आजही गांधीजींच्या प्रतिकांवर हल्ले चढवत आहेत.
महात्माजी स्वतःला हिंदु म्हणवत असत,मात्र त्यात गर्वअभिमानाचा लवलेशही नव्हता.नैसर्गिक सहजभाव होता.त्यांचा हिंदुधर्म मंदिरात किंवा एखाद्या देवतेच्या मुर्तीमध्ये बंदिस्त नव्हता. ईश्वर-अल्ला तेरो नाम,सबको सन्मती दे भगवान ही त्यांची एकोप्याची शिकवण होती.सर्व जातीधर्मांना जोडणारी विचारधारा हाच राष्ट्रपित्याचा आचारधर्म होता.नेमके हेच तर नथुरामसारख्या कट्टरतावाद्यांना खटकत होते.म्हणूनच तर फाळणीच्याही आधीपासून गांधीजींवर जिवघेणे हल्ले करण्याचे अयशस्वी प्रयत्न झाले होते. नीच नथुरामचा 'तो' कपटी कट मात्र यशस्वी ठरला.गांधीबाबांचा खूनी नथुराम जरी फासावर लटकवण्यात आला तरी नथुरामाची निर्लज्ज पिलावळ भारतात अजूनही वळवळ करताना आढळते.
खरेतर उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या आणि आपल्या मानवतावादी विचाराने जगभरात दिगंत किर्ती मिळवलेल्या महात्मा गांधीजी यांच्या खूनानंतर देशात आणि महाराष्ट्रात बहूजन रक्त खवळून उठले होते.त्याला वेळीच आवरले नसते तर तमाम परशुरामी प्रवृत्तीचाच निर्वंश घडला असता...पण या राष्ट्रातील बहुसंख्याकांची मानसिकता ही सम्राट बळीराजा,तथागत गोतम बुध्द यांच्या सहिष्णुविचाराचा सन्मान करणारी असल्यामुळेच गोडसेची पिलावळ जीवंत राहू शकली.अन्यथा गांधींच्या खून्याची तरफदारी करणार्यांचे नामोनिशाणही शिल्लक राहीले नसते!
आज गांधीविचाराला अवघ्या जगाने डोक्यावर घेतले आहे.भारतात मात्र हिंदुमहासभेसारख्या नामशेष झालेल्या गांधीद्वेष्ट्या पक्षातली चारदोन टाळकी अजूनही गांधीजींच्या निर्जीव प्रतिमेवर निशाणा साधण्याची मुर्ख आणि थिल्लर कुकृती करुन स्वतःचेच हसे करुन घेत आहेत.
कमल हासन यांच्या वक्तव्यावर टीका करुन पोंक्षेंसारखी जातखोर मंडळी आपली नथ्थुप्रवत्तीचेच प्रदर्शन करत आहेत.आज संपूर्ण देशातच अशा माणुसकीद्रोही कट्टरतावाद्यांना राजकीय संरक्षणाची छत्रछाया मिळताना दिसतेय.देशाच्या संविधानाऐवजी माणुसघाण्या मनुस्मृतीला मानणार्या या नथुरामी अवलादी राष्ट्रीय एकात्मतेच्या नरडीचा घोट घेण्यासाठी टपून बसल्यायत.कधी शरद पोंक्षे तर कधी विक्रम वा चंद्रशेखर गोखले यांच्या तोंडावाटे नथुरामी विकृतीचा परशुरामी अविष्कार अनुभवण्यास मिळतोय.
दहशतवादी नीच नथुरामाचा आज कुणाला कितीही पुळका आला तरी महात्मा गांधी आणि त्यांचे विचार हे अमर,अजरामरच आहेत.हा देश गांधीजीनी दाखवलेल्या मार्गाचेच अनुसरण करत राहणार हे मात्र निश्चीत.