काफिर कविच्या कविता
-----------------------
१)महानिर्वाण
उफाळती नदी पोहायला नव्हे
बुडायला शिकवत असते
किनार्यावर पोहोचणे
घाबरटांचे काम आहे
होडी------(म्हणजे)
.....गळपटलेल्या मनुष्याचा शोध
२) रविवार
मी स्टॅलिनला फोन करतो,
विनंतीअर्ज पाठवतो माओला,
हांजीहांजी करतो हिटलरची,
लेनिनपुढे हात जोडतो,
पण कुणीही बाद करु शकत नाही
आठवड्यामधून रविवारला----
.....आणि मला पून्हा तुझ्याविना
घालवावा लागतो आणखी
एक दिवस.
३) भिती
१
राजधानीच्या बाहेर
अरण्यातून
आवाज येतो....
'बुध्दम् सरणम् गच्छामि।'
........आणि राजा घाबरत
आपल्या मुलांना महालात
लपवून ठेवतो
४) भिती
२
जेव्हा लोक एकमेकांच्या
प्रेमात
वेडे व्हायला लागले...
....त्यांनी (मग)युध्दाची
घोषणा
करणेच उचित मानले.
५) (रामराज्य)
मेण्याच्या आत
प्रत्येक रात्री
तिला द्यावा लागतो
आपल्या सतीत्वाचा पुरावा
शेजेवरती
विवस्त्र होऊन
स्वेच्छेने किंवा स्वेच्छेविना...
....आणि दूर कुठेतरी गर्जू लागतात
रामराज्याच्या जयजयकाराच्या
(गगनभेदी) घोषणा.
६) काश्मिर | राष्ट्र
एक कारागृह
जिथे लष्करी
टापांच्या तालावर
गायिले जात आहे--राष्ट्रगान
७) बीज
युध्दाच्या काळातसुध्दा
तो आणत राहिला
पुस्तकं
आपल्या मुलांसाठी...
....कारण त्यांनी लढू
नयेत
येणार्या लढाया(यासाठी)
८)बुध्दीजीवी
युध्दकाळात तो गप्प
राहिला....
....युध्दसमाप्तीनंतर त्याने(एक)
दीर्घ सुस्कारा सोडला
आणि (तो)मौन झाला.
९) चर्चा
१
दोघांचा वादविवाद
जुंपलेला
जेव्हा सगळेच
मुद्दे संपले,
त्यांच्यातील एकाने
मंत्रोच्चारण आरंभले....
.....आणि वाद संपला.
२
दोघेजण चर्चा करत होते
जेव्हा सगळेच मुद्दे संपले
त्यातील एकाने
शिव्या हासडण्यास
सुरुवात केली...
.......आणि
चर्चा आटोपली.
१०) संस्कृती
....खून करण्याकरिता
सुर्याऐवजी....
....बंदूकीचा वापर केला जाणे.
मूळ हिंदी कविता कवी काफिर यांच्या आहेत.
(हिंदी संकेतस्थळ जानकीपूल वरुन साभार)
-----------------------
१)महानिर्वाण
उफाळती नदी पोहायला नव्हे
बुडायला शिकवत असते
किनार्यावर पोहोचणे
घाबरटांचे काम आहे
होडी------(म्हणजे)
.....गळपटलेल्या मनुष्याचा शोध
२) रविवार
मी स्टॅलिनला फोन करतो,
विनंतीअर्ज पाठवतो माओला,
हांजीहांजी करतो हिटलरची,
लेनिनपुढे हात जोडतो,
पण कुणीही बाद करु शकत नाही
आठवड्यामधून रविवारला----
.....आणि मला पून्हा तुझ्याविना
घालवावा लागतो आणखी
एक दिवस.
३) भिती
१
राजधानीच्या बाहेर
अरण्यातून
आवाज येतो....
'बुध्दम् सरणम् गच्छामि।'
........आणि राजा घाबरत
आपल्या मुलांना महालात
लपवून ठेवतो
४) भिती
२
जेव्हा लोक एकमेकांच्या
प्रेमात
वेडे व्हायला लागले...
....त्यांनी (मग)युध्दाची
घोषणा
करणेच उचित मानले.
५) (रामराज्य)
मेण्याच्या आत
प्रत्येक रात्री
तिला द्यावा लागतो
आपल्या सतीत्वाचा पुरावा
शेजेवरती
विवस्त्र होऊन
स्वेच्छेने किंवा स्वेच्छेविना...
....आणि दूर कुठेतरी गर्जू लागतात
रामराज्याच्या जयजयकाराच्या
(गगनभेदी) घोषणा.
६) काश्मिर | राष्ट्र
एक कारागृह
जिथे लष्करी
टापांच्या तालावर
गायिले जात आहे--राष्ट्रगान
७) बीज
युध्दाच्या काळातसुध्दा
तो आणत राहिला
पुस्तकं
आपल्या मुलांसाठी...
....कारण त्यांनी लढू
नयेत
येणार्या लढाया(यासाठी)
८)बुध्दीजीवी
युध्दकाळात तो गप्प
राहिला....
....युध्दसमाप्तीनंतर त्याने(एक)
दीर्घ सुस्कारा सोडला
आणि (तो)मौन झाला.
९) चर्चा
१
दोघांचा वादविवाद
जुंपलेला
जेव्हा सगळेच
मुद्दे संपले,
त्यांच्यातील एकाने
मंत्रोच्चारण आरंभले....
.....आणि वाद संपला.
२
दोघेजण चर्चा करत होते
जेव्हा सगळेच मुद्दे संपले
त्यातील एकाने
शिव्या हासडण्यास
सुरुवात केली...
.......आणि
चर्चा आटोपली.
१०) संस्कृती
....खून करण्याकरिता
सुर्याऐवजी....
....बंदूकीचा वापर केला जाणे.
मूळ हिंदी कविता कवी काफिर यांच्या आहेत.
(हिंदी संकेतस्थळ जानकीपूल वरुन साभार)
फारच छान 👌
उत्तर द्याहटवा