रंग (कविता)

रंग (कविता)

रंग
---
सकाळी उठून पाहिलं तर आकाश
लाल,पिवळ्या,शेंदरी आणि विटकरी रंगांनी भरुन गेलेलं होतं

मजा आली बरं,'आकाश हिंदू झालंय'
शेजारी ओरडून म्हणाला.
'आता तर आणखी मजा येईल'
मी म्हणालो
पाऊस येऊ द्या
अवघी धरती मुसलमान होऊन
जाईल!
--------------

हिंदी रचना
नरेश सक्सेना

मराठी भावानुवाद
भरत यादव

साभार
हिंदीनामा

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने