सत्तेचं विकेंद्रीकरण (कविता)

सत्तेचं विकेंद्रीकरण (कविता)

सत्तेचं विकेंद्रीकरण
------------------------

गृहमंत्री यासाठी खुश होते की,
पोलीस प्रमुखानीं फारच दुर्मिळ
प्रकारचे क्रौर्य दाखवले
जे यासाठी आनंदीत होते की,
एसपीनींही काही कमी क्रौर्य दाखवले नव्हते
जे याकरिता
खुश होते की,
डीसपीनीं
टोकाची संवेदनहीनता दर्शवली
जे यामुळे भारुन गेले होते की,
पोलीस निरीक्षकांनी लज्जास्पद पाशवीपणा दाखवला
जे यामुळे निश्चिंत झाले होते की,
पोलिस उपनिरीक्षकांनी काळीज हादरवणार्‍या हिंसेचे दर्शन घडवले
जे काॅंन्स्टेबलच्याही क्रूरतेने अतिशय समाधानी होते!

.......तर या कोड्याचं उत्तर खात्रीने मिळेल असं दिसतंय की,
चौकात हलणार्‍या डुलणार्‍या अपरिचीत शिपायामध्ये
गृहमंत्र्यांची चलाखी
त्यांची अपारदर्शकवृत्ती
आत्ममग्नता
टगेगिरी
क्रूरता
लबाडी
इत्यादी इत्यादी (अव)गुण
एकत्रित कसे काय सापडतात
--------------------------------

हिंदी कविता
देवी प्रसाद मिश्र

मराठी भावांतर
भरत यादव

साभार
पहल

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने