फॅसिस्ट (कविता)

फॅसिस्ट (कविता)

 
फॅसिस्ट

मी म्हणालो की तुम्ही फॅसिस्ट आहात
तो म्हणाला की तो मनुष्य आहे

मी म्हणालो की तुम्ही फॅसिस्ट आहात
तर तो म्हणाला की तो लोकप्रतिनिधी आहे

मी म्हणालो तुम्ही फॅसिस्ट आहात
तर तो म्हणाला त्याच्याजवळ आधारकार्ड आहे

मी म्हणालो तुम्ही फॅसिस्ट आहात
तर तो म्हणाला की तो शाकाहारी आहे

मी म्हणालो की तुम्ही फॅसिस्ट आहात
तर तो म्हणाला की मुद्दा विकास (हा) आहे
(मी विनाश असे ऐकले)

मी म्हणालो तुम्ही फॅसिस्ट आहात
तर तो म्हणाला की त्याच्याकडे तीस टक्क्यांचं बहूमत आहे
सत्तर टक्क्यांच्या अल्पमतांच्या तुलनेत

मी म्हणालो की तुम्ही फॅसिस्ट आहात
तर तो म्हणाला गांधींना आम्ही नाही मारले, आमच्यातल्याच कुणीतरी त्यांच्यावर गोळी झाडली

मी म्हणालो की तुम्ही फॅसिस्ट आहात
तर तो म्हणाला की आता जे काही आहे ते आम्हीच आहोत
---------
हिंदी कविता
देवी प्रसाद मिश्र

मराठी अनुवाद
भरत यादव

साभार
जलसा ४ (संकलन)
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने