हिंदू (कविता)

हिंदू (कविता)

हिंदू🚩
-----
राम राम म्हणेन
हजारो वर्षांपासून म्हणत आले आहेत पूर्वज

नाही करणार शेजार्‍यांचा तिरस्कार
धरती एक कुटुंब आहे असं म्हटलं होतं पूर्वजांनी

सत्यावर माझाच हक्क नाही
अनेक मार्ग आहेत ज्याला जे हवं तसं तो निवडू शकेल

कामाची प्रापंचिकता आणि मोक्षाची आध्यात्मिकता रितीविरुध्द नाहीए माझ्यासाठी

सूर्याला अर्घ्य देईन
चंद्रबिंबाखाली गोड खीर रटरटेल
पूजा करेन नद्यांची
पर्वतांवर चढण्याआधी वंदन करेन
झाडांभोवती प्रदक्षिणाही घालेन

बुध्दांप्रमाणे अघोरीपणापासून बचाव करणे शिकलोय
मी तो हिंदू नाही,
जो समुद्र ओलांडत नव्हता
आपल्या वर्णात अडकलेला
स्वकीयांशी भेदभाव करायचा
गप्प राहात होता एकलव्याचा अंगठा कापला गेल्यानंतरही

मी वाचलेत मीर-गालिब-शेक्सपियर
मला घडवलंय गांधी,आंबेडकर, लोहिया यांनी
-----------------------

हिंदी कविता
अरुण देव

मराठी अनुवाद
भरत यादव

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा
थोडे नवीन जरा जुने