।।वंशवृक्ष।।
माझे वडिल मजूर होते
माझी आई कुळंबीण होती
माझ्या वडिलांचे वडील मजूर होते
माझ्या आईची आई कुळंबीण होती
कष्टातून निपजलेला,
माझ्यामध्ये पिढ्यानपिढ्यांचा थकवा आहे
मी आयुष्यभर मजूर होतो,
आणि आता नाहीए
पण मजूरांना पाहतो अन्
पिढीजात थकव्याने भरुन पावतो
----------------------
मूळ हिंदी रचना
संतोष अर्श
मराठीकरण
भरत यादव
---------
शब्दार्थः
कुळंबीण-स्त्री शेतकरी,
महिला कृषक