........
लोकशाहीच्या या मेंढरगर्दीत
कसा सामील होऊ
डोळे मिटून
तेव्हा जेव्हा की------
आत्ताच कुणीतरी दरवाजावर खटखट
आवाज केलाय
आणि समोर पडलेला कलबुर्गींचा फोटो हसरा झालाय
कण्हेरझाडीच्या खाली
अखलाक आणि पहलू खान यांची प्रेतं पडली आहेत,
शेतांच्या मधोमध उभ्या जीपमध्ये
आत्ताच एक इन्सपेक्टर मारला गेलाय
बॅंकेसमोर उभ्या असलेल्या लोकांमध्ये
आत्ताच एका महिलेने बाळाला जन्म दिलाय
इस्पितळात इलाजासाठी
पैशांच्या आशेने उभे असलेल्यांचे हात मोकळेच आहेत
मुलीच्या लग्नाच्या तणावाने
आत्ताच एक बाप बुडून मेलाय
एक बोगस पदवीधारक
खोटं बोलण्यासाठी धडपडतोय
खरा पदवीधारक युवक
रोस्टर(च्या) वादात अडकलाय
शेती सोडून शेतकरी
झाडाला लटकला आहे
पुलवामातील जवानांच्या मृत्यूच्या
कारणांचा शोध (अजून) बाकी आहे
उना गावातील दलितांच्या पाठीवर
वेताचा आवाज घुमतो आहे
जळगावात पाण्यासाठी मेलेल्या
दलित लेकराला अजूनही शोधतो आहे
हसणार्या चेहर्यांच्यामधे
आसिफाच्या किंकाळ्या ऐकू येतायत
गोरखपुरात आॅक्सिजनटंचाईने
लेकरं तडफडून मरतायत
नजीबच्या अम्मीने
आत्ताच मला हाक मारलीय
रोहीत वेमुलाच्या आईचा
पदर (अजून)आसवांनी ओलाच आहे
अरावली घाटात एक मजूर
आत्ता एवढ्यात मारला गेलाय
रोजगारासाठी चौकात उभा
प्रत्येक हात रिकामाच आहे
एक एक थेंब घामाचा
मूठभरांच्या मुठीत बंद आहे
चौथ्या स्तंभाचा खोटारडेपणा
हेच सगळ्यात मोठे सत्य आहे
अशावेळी-----
लोकशाहीच्या या मेंढरगर्दीत
कसा सामील होऊ
डोळे मिटून!
---------------------------
हिंदी कविता
नलिन रंजन सिंह
मराठी अनुवाद
भरत यादव
लोकशाहीच्या या मेंढरगर्दीत
कसा सामील होऊ
डोळे मिटून
तेव्हा जेव्हा की------
आत्ताच कुणीतरी दरवाजावर खटखट
आवाज केलाय
आणि समोर पडलेला कलबुर्गींचा फोटो हसरा झालाय
कण्हेरझाडीच्या खाली
अखलाक आणि पहलू खान यांची प्रेतं पडली आहेत,
शेतांच्या मधोमध उभ्या जीपमध्ये
आत्ताच एक इन्सपेक्टर मारला गेलाय
बॅंकेसमोर उभ्या असलेल्या लोकांमध्ये
आत्ताच एका महिलेने बाळाला जन्म दिलाय
इस्पितळात इलाजासाठी
पैशांच्या आशेने उभे असलेल्यांचे हात मोकळेच आहेत
मुलीच्या लग्नाच्या तणावाने
आत्ताच एक बाप बुडून मेलाय
एक बोगस पदवीधारक
खोटं बोलण्यासाठी धडपडतोय
खरा पदवीधारक युवक
रोस्टर(च्या) वादात अडकलाय
शेती सोडून शेतकरी
झाडाला लटकला आहे
पुलवामातील जवानांच्या मृत्यूच्या
कारणांचा शोध (अजून) बाकी आहे
उना गावातील दलितांच्या पाठीवर
वेताचा आवाज घुमतो आहे
जळगावात पाण्यासाठी मेलेल्या
दलित लेकराला अजूनही शोधतो आहे
हसणार्या चेहर्यांच्यामधे
आसिफाच्या किंकाळ्या ऐकू येतायत
गोरखपुरात आॅक्सिजनटंचाईने
लेकरं तडफडून मरतायत
नजीबच्या अम्मीने
आत्ताच मला हाक मारलीय
रोहीत वेमुलाच्या आईचा
पदर (अजून)आसवांनी ओलाच आहे
अरावली घाटात एक मजूर
आत्ता एवढ्यात मारला गेलाय
रोजगारासाठी चौकात उभा
प्रत्येक हात रिकामाच आहे
एक एक थेंब घामाचा
मूठभरांच्या मुठीत बंद आहे
चौथ्या स्तंभाचा खोटारडेपणा
हेच सगळ्यात मोठे सत्य आहे
अशावेळी-----
लोकशाहीच्या या मेंढरगर्दीत
कसा सामील होऊ
डोळे मिटून!
---------------------------
हिंदी कविता
नलिन रंजन सिंह
मराठी अनुवाद
भरत यादव