मुडदे भाकरी मागत होते

मुडदे भाकरी मागत होते

मुडदे भाकरी मागत होते
------------------------------
मुडदे भाकरी मागत होते
मृत स्त्रियांमध्ये जीव आला होता आणि
त्याही समानता मागत होत्या
ज्यांना चिरडण्यात आलं हजारो वर्षे
ते मुडदे शोषकांच्या पायाखालून
डोकं वर काढत होते
घाण साफ करणारे आणि मेलेली जनावरे
ओढून कातडी सोलणारे मुडदेसुध्दा
शोषकांशी बरोबरी करण्याची स्वप्नं
पाहायला लागले होते
मग शोषकांनी एका जुन्या मशिदीसमोर
उभे राहून म्हटलं,
जर इथे पाच हजार वर्षांपूर्वी
मरुन गेलेल्या आपल्या चक्रवर्ती सम्राटाचे मंदिर
नाही उभारले तर आपला धर्म मरुन जाईल
मग एक जादू घडली
मुडद्यांनी जुन्या मशिदीला पाडलं
मशिद तोडल्यानंतर मेलेले मुडदे
पून्हा
शोषकांच्या चरणी लीन झाले
शोषक राजसिंहासनावर बसला
आणि मुडदे पाच हजार वर्षांपूर्वी
मरुन गेलेल्या सम्राटाच्या जयजयकारात गुंग होऊन गेले
शोषकांची सत्ता पक्की झाली
मुडदे पून्हा मुडदे बनले
भाकरीची मागणी संपून गेली
मग जेव्हा एखादी लहानगी भात मागत होती
तेव्हा सिंहासनाच्या इशार्‍याने मुडदे उठून
गायीबरोबर चालणार्‍यांचे रक्त रस्त्यावर
पसरवत होते आणि भात मागणार्‍या
लहानगीचा विषय काढणार्‍या महिलेवर
गोळ्या बरसवल्या जात होत्या...
------------------------------------------
मूळ हिंदी कविता
हिमांशू कुमार

मराठी अनुवाद
भरत यादव
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने