सत्ताधार्यांप्रति...!
आपण जे जे सांगाल,
मी तंतोतंत ते ते तसेच
करेन!
तेच खाईन,तेच ल्याईन
तेच तेच लावून
निघेन फिरायला!
सोडून देईन,
माझी खासगी जमीनदेखील
आणि निघून जाईन,
'ब्र' ही न उच्चारता!
जर आपण सांगितलं,
की
गळ्यात दोर अडकवून
लटकत राहा रात्रभर---
तर अगदी तसेच करेन!
मात्र ,
दुसर्यादिवशी,
जेव्हा तुम्ही हुकूम सोडाल,
ये,
आता खाली उतर!
तेव्हा मला उतरवण्यासाठी,
अापणांस आणखी
काहीजणांची गरज पडेल,
मी उतरु शकणार नाही,
स्वतःहून,
एकटा!
आपणांस विनंती आहे,
माझ्या या अल्पशा
अकार्यक्षमतेकडे
कृपया लक्ष देऊ नये!!!
----------------------
मूळ बंगाली कविता
जय गोस्वामी
हिंदी अनुवाद
सुशील गुप्ता
मराठी अनुवाद
भरत यादव
आपण जे जे सांगाल,
मी तंतोतंत ते ते तसेच
करेन!
तेच खाईन,तेच ल्याईन
तेच तेच लावून
निघेन फिरायला!
सोडून देईन,
माझी खासगी जमीनदेखील
आणि निघून जाईन,
'ब्र' ही न उच्चारता!
जर आपण सांगितलं,
की
गळ्यात दोर अडकवून
लटकत राहा रात्रभर---
तर अगदी तसेच करेन!
मात्र ,
दुसर्यादिवशी,
जेव्हा तुम्ही हुकूम सोडाल,
ये,
आता खाली उतर!
तेव्हा मला उतरवण्यासाठी,
अापणांस आणखी
काहीजणांची गरज पडेल,
मी उतरु शकणार नाही,
स्वतःहून,
एकटा!
आपणांस विनंती आहे,
माझ्या या अल्पशा
अकार्यक्षमतेकडे
कृपया लक्ष देऊ नये!!!
----------------------
मूळ बंगाली कविता
जय गोस्वामी
हिंदी अनुवाद
सुशील गुप्ता
मराठी अनुवाद
भरत यादव